"ज्या कपड्यांमध्ये मला दाखवलं...", १५ वर्षांची असताना आक्षेपार्ह साईटवर फोटो पाहून घाबरलेली जान्हवी कपूर, सांगितला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:46 IST2026-04-06T11:43:41+5:302026-04-06T11:46:09+5:30

"माझे फोटो 'त्या' साईटवर पाहिले अन्...", जान्हवी कपूरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली-"वर्गात मुले…"

bollywood actress janhvi kapoor recalls about finding her morphed photos on inappropriate websites | "ज्या कपड्यांमध्ये मला दाखवलं...", १५ वर्षांची असताना आक्षेपार्ह साईटवर फोटो पाहून घाबरलेली जान्हवी कपूर, सांगितला 'तो' प्रसंग

"ज्या कपड्यांमध्ये मला दाखवलं...", १५ वर्षांची असताना आक्षेपार्ह साईटवर फोटो पाहून घाबरलेली जान्हवी कपूर, सांगितला 'तो' प्रसंग

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल टाकत लेक जान्हवी (Janhvi Kapoor) देखील सिनेसृष्टीत स्थिरावली आहे. सध्याच्या घडीला ती इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  २०१८ साली प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय गुंजन सक्सेना- द कारगिल वॉर,रुही, गुड लक जेरी, मिली यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील तिनं अभिनय केला आहे. स्टारकिड असल्यामुळे जान्हवी बऱ्याचदा चर्चेत असते. याचा तिचा फायदाही झाला आणि तोटा सुद्धा झाला. यामुळे तिला काही वाईट अनुभवांना देखील सामोरं जावं लागलं.

अभिनयाचं चंदेरी जग लांबून जितकं आकर्षक दिसतं. त्याचं वास्तव मात्र भीषण असतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिला आलेले काही वाईट अनुभव कथन केले.राज शमानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी कपूरने सांगितलं, जेव्हा ती १५ वर्षांची होती, तेव्हा तिने काही अश्लील साइट्सवर तिचे काही मॉर्फ केलेले फोटो पाहिले होते. ते फोटो पाहून ती खूप घाबरली होती. 

त्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली," ते डीपफेक होतं की नाही हे मला माहीत नाही. मी माझे फोटो एका अश्लील साईटवर पाहिले. त्यावेळी मी शाळेत आयटीच्या वर्गात होते आणि माझ्या वर्गातील मुलं त्या साईट्सवर फोटो बघत होते. धक्कादायक म्हणजे त्यात माझेही फोटो होते.  तो एक विचित्र आणि भीतीदायक अनुभव होता."

मानसिक परिणाम झाला…

त्यानंतर जान्हवी म्हणाली,  स्टार किड असल्यामुळे तिचं आयुष्य अगदी सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनलं. त्यामुळे, या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाला होता. अभिनेत्री म्हणाली,"मी यामुळे खूप अस्वस्थ होते. आजही काही ठिकाणी माझे असे फोटो आहेत जे एआयच्या मदतीने बनवले गेलेत. ज्या कपड्यांमध्ये मला दाखवले जात आहे, ते कपडे मी कधीही घातलेले नाहीत. किंवा तसे कपडे देखील मी परिधान केले नाहीत."

याचा कामावरही परिणाम होतो...

या मुलाखतीत जान्हवीने म्हटलं की या सगळ्याचा कामावरही परिणाम होतो." लोकांना असे एआयने तयार केलेले फोटो खरे वाटतात. त्यामुळे आपली एक वेगळीच प्रतिमा तयार होते.भविष्यात जर मी एखाद्या दिग्दर्शकाला अशा प्रकारची कोणती गोष्ट करण्यास नकार दिला तर ते हे बनावट फोटो दाखवून म्हणून शकतात. हे तू तर आधी केलंय ना. भले ते कधी काही बोलले नाही. पण, याची माझ्या मनात कायम भीती असते. असं जान्हवीने यावेळी सांगितलं.

Web Title : जान्हवी कपूर को अश्लील साइटों पर मॉर्फ्ड तस्वीरें मिलने का डर याद आया।

Web Summary : जान्हवी कपूर ने बताया कि किशोरावस्था में वयस्क वेबसाइटों पर मॉर्फ की हुई तस्वीरें देखकर वह भयभीत हो गई थीं। उन्हें डर है कि एआई-जनित नकली छवियां उनके करियर को प्रभावित कर सकती हैं, जिससे एक झूठी सार्वजनिक धारणा बन सकती है। इसका उनके जीवन पर स्थायी प्रभाव पड़ा है।

Web Title : Janhvi Kapoor recalls horror of finding morphed photos on obscene sites.

Web Summary : Janhvi Kapoor revealed being horrified as a teen after discovering morphed photos on adult websites. She fears AI-generated fake images could impact her career, creating a false public perception. This has had a lasting impact on her life.