भारताचा नावाजलेला बॅडमिंटनपटू, माधुरी दीक्षितवर होता क्रश! लग्नाची बातमी कळताच झालेली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:49 IST2025-08-13T15:20:17+5:302025-08-13T15:49:27+5:30
माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी वाचताच दीपिकाच्या वडिलांची झालेली 'अशी' अवस्था

भारताचा नावाजलेला बॅडमिंटनपटू, माधुरी दीक्षितवर होता क्रश! लग्नाची बातमी कळताच झालेली अशी अवस्था
Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणजेच माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) जगभर चाहते आहेत. माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे. 'हम आपके हैं कौन', 'दिल', 'दिल तो पागल है' आणि 'देवदास' सारख्या चित्रपटांमधून तिने सिनेरसिकांना भुरळ घातली. मात्र. यशाच्या शिखरावर असताना तिने डॉ.नेनेंसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लाखों तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीचं लग्न झाल्यानंतर अनेकांची हृदय तुटली. यापैकी एक होते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणने तिच्या वडिलांची आवडती अभिनेत्री कोण होती याबद्दल खुलासा केला होता. शिवाय माधुरीचं लग्न ठरल्याची बातमी कळताच ते खूप रडले होते. तो किस्सा सांगताना दीपिकाने म्हटलं, 'माझ्या वडिलांचा माधुरी दीक्षितवर क्रश होता. जेव्हा त्यांना माधुरी दीक्षितच्या लग्नाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले आणि खूप रडले. त्यामुळे त्यांचे डोळे सुजले. आजही घरातील प्रत्येकजण अजूनही त्या घटनेची आठवण करून हसतात. असा मजेशीर किस्सा अभिनेत्रीने शेअर केला होता.
दीपिका पादुकोणचे वडील हे भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटूंपैकी एक होते. उज्वला यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर ते कोपेनहेगला स्थायिक झाले होते. तिथेच त्यांना नोकरी मिळाली. दीपिका स्वतः देखील बॅडमिंटनपटू आहे, पण ती चित्रपटांकडे वळली.