बॉलिवूडची ही अभिनेत्री आता करणार रायफल शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:49 IST2019-07-08T18:48:38+5:302019-07-08T18:49:24+5:30
सलमान खानसोबत झळकलेली ही अभिनेत्री रायफल शूटिंगच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री आता करणार रायफल शूटिंग
अभिनेत्री डेझी शहा हिने रेस ३, हेट स्टोरी ३ व जय हो या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती रेस ३ मधील एका संवादामुळे चर्चेत आली होती.
डेझीला अभिनया व्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. त्यापैकीच एक डेझीला रायफल शुटिंगची आवड आहे. इतकेच नाही तर ती पॉईंट २२ या रायफल शुटिंग स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
डेझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने रायफल शुटिंग स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. काही दिवसापूर्वीच डेझीला नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून रायफल शुटिंगचा परवानादेखील मिळाला आहे.
विशेष बाब म्हणजे डेझी बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे, जिच्याकडे रायफल शुटिंगचे लायसन्स आहे. पुढील महिन्यामध्ये ही रायफल शुटिंग स्पर्धा होणार आहे आणि सध्या डेझी या स्पर्धेची जय्यत तयारी करते आहे.
यापूर्वी एप्रिल महिन्यात इंदूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ती पात्र ठरली होती. आता डेझी रायफल शुटिंगमध्ये काय कमाल दाखवते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.