भटक्या कुत्र्यामुळे भेटले अन् प्रेमात पडले! जरा हटके आहे अभिनेत्रीची लव्हस्टोरी, वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:52 IST2025-10-14T13:45:48+5:302025-10-14T13:52:58+5:30
भटक्या कुत्र्यामुळे आयुष्यभराचा साथीदार भेटला! फिल्मी आहे अभिनेत्रीची लव्हस्टोरी

भटक्या कुत्र्यामुळे भेटले अन् प्रेमात पडले! जरा हटके आहे अभिनेत्रीची लव्हस्टोरी, वाचा किस्सा
Bollywood Actress: प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीवर, तिच्या हेतूंवर, भूमिकेवर, दृष्टिकोनावर असलेला डोळस विश्वास. कोण, कधी, कुठे आणि कोणाच्या प्रेमात पडेल ,याचा काही नेम नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील प्रेम प्रकरणं तर फारच चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जी तिच्या अतरंगी लव्हस्टोरीमुळे चर्चेत आली आहे. चक्क भटक्या कुत्र्यामुळे अभिनेत्रीची तिच्या होणार्या पतीबरोबर भेट झाली. या अभिनेत्रीचं नाव चारु शंकर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत मजेशीर किस्सा तिने शेअर केला आहे.
अभिनेत्री चारु शंकरने रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमात त्याच्या आईची भूमिका साकारली होती. दरम्यान, अभिनेत्रीने नवभारत टाइम्स ला मुलाखत दिली. या मुलाखतीत चारुने तिचं बालपण तसेच अभिनय क्षेत्रातील प्रवास याविषयी बऱ्याच आठवणी शेअर केल्या. त्या आठवणींबरोबर तिने लव्हस्टोरीचा खास किस्सा देखील शेअर केला. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी रंगभूमीवर काम करु लागले. मी थिएटरमध्ये बिझी झाले. तेव्हा मी डान्स आणि अभिनयामध्ये प्रचंड व्यस्त झाले. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी प्रचंड थकायचे."
यानंतर पुढे अभिनेत्रीने तिच्या लव्हस्टोरीचा मजेशीर किस्सा सांगितला. तेव्हा ती म्हणाली, "माझी लव्हस्टोरी फारच फिल्मी आहे. राघव आणि माझी भेट कोणताही डेटिंग अॅप किंवा मैत्र-मैत्रीणींच्या घरी नाहीतर तर एका भटक्या कुत्र्यामुळे झाली. एका कुत्र्याला वाचवताना झाली. एके दिवशी मी माझ्या गाडीतून घरी परत येत होते. तर रस्त्यात एका भटक्या कुत्रा जखमी अवस्थेत दिसला. त्याला पाहून मी गाडीतून खाली उतरले. त्याचदरम्यान, माझी भेट राघवसोबत झाली. आम्हा दोघांनाही मुके प्राणी फार आवडतात. कुत्रा वाचला पण आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर मग आमची चांगली मैत्री झाली आणि मग भेटीगाठी वाढल्या. अखेर आम्ही लग्न केलं."
दरम्यान, चारु शंकर यांनी सुरुवातील फिटनेस शो करत होत्या. त्यानंतर त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. सियासत या मालिकेत त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती.