अभिनेत्रीला न सांगताच शूट केला बोल्ड सीन अन् करिअरला लागला ब्रेक; अक्षयची हिरोईन आता जगतेय 'असं' जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:44 IST2025-07-28T16:33:17+5:302025-07-28T16:44:15+5:30

'तो' बोल्ड सीन अन् करिअरला लागली उतरती कळा! दिग्दर्शकानं फसवून केलं असं काही...

bollywood actress ayesha jhulka film industry journey know about her all infromation | अभिनेत्रीला न सांगताच शूट केला बोल्ड सीन अन् करिअरला लागला ब्रेक; अक्षयची हिरोईन आता जगतेय 'असं' जीवन

अभिनेत्रीला न सांगताच शूट केला बोल्ड सीन अन् करिअरला लागला ब्रेक; अक्षयची हिरोईन आता जगतेय 'असं' जीवन

Bollywood Actress: बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत अशाही नायिका आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांमुळे नाहीच तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. त्यातीलच एक नाव म्हणजे आयेशा जुल्का. ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आयेशा जुल्काचं नाव अदबीने घेतलं जातं. या अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अक्षय कुमारसह अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांसोहबत काम केलं आहे. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नेती सिद्धार्थ' या तेलुगू चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर आयेशाने सलमान खानच्या कुर्बान सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. सहज सुंदर अभिनयाने या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. परंतु,एका चित्रपटातील बलात्काराच्या सीनमुळे अभिनेत्रीच्या करिअरला फुलस्टॉप लागला. ती इंडस्ट्रीपासून दुरावली गेली.

'जो जिता वहीं सिकंदर', 'खिलाडी' तसेच 'वक्त हमारा है' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आयेशा जुल्का महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. या चित्रपटांमध्ये आयशा झुल्काने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं. परंतु, १९९३ मध्ये दलाल चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे अभिनेत्रीने इंडस्ट्रीपासून दुरावली गेली. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच तिने २००३ साली बिझनेसमॅन समीर वाशीशी लग्न केलं आणि त्यानंतर कलाविश्वातून एक्झिट घेतली.

खरंतर, 'दलाल' या सिनेमात आयेशा यांचा एक बोल्ड सीन दाखवण्यात येणार होता. हा सीन बॉडी डबल करणार होती. परंतु, हा सीन सिनेमात नसावा असं आयेशा यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या सीनविषयी कळताच ती रागामध्ये दिग्दर्शकांकडे गेली. यावेळी दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि पार्थो घोष यांनी आयेशाला पुन्हा शब्द दिला की सिनेमात असं काही नसेल. इतकंच नाही तर प्रकाश मेहरांच्या पत्नीनेदेखील आयेशाची समजूत काढली होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा सीन आहे तसाच ठेवण्यात आला होता. ज्यामुळे आयेशाच्या इमेजला धक्का लागला. त्या एका सीननंतर तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. पण दोघांनाही मुले नाहीत.  बिझनेसमॅन समीर वाशीशी लग्न आयेशा तिच्या वैवाहिक आयुष्यात 

अलिकडेच आयशा जुल्का २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जीनियस' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं होतं. 

Web Title: bollywood actress ayesha jhulka film industry journey know about her all infromation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.