"केमोथेरपी टाळली त्यामुळे...", अरुणा इराणींना दोनदा झालेला स्तनाचा कर्करोग, म्हणाल्या- "केस गळतील म्हणून... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:40 IST2025-06-18T11:38:37+5:302025-06-18T11:40:43+5:30

दोनदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं अन्; अरुणा इराणींचा खुलासा; म्हणाल्या- "केमोथेरपी टाळली म्हणून..."

bollywood actress aruna irani revealed about she battling breast cancer twice refused chemotherapy | "केमोथेरपी टाळली त्यामुळे...", अरुणा इराणींना दोनदा झालेला स्तनाचा कर्करोग, म्हणाल्या- "केस गळतील म्हणून... "

"केमोथेरपी टाळली त्यामुळे...", अरुणा इराणींना दोनदा झालेला स्तनाचा कर्करोग, म्हणाल्या- "केस गळतील म्हणून... "

Aruna Irani: ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी (Aruna Irani) या हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. वयाच्या ८० व्या वर्षीही त्या कलाविश्वात तितक्याच सक्रिय असून प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहेत. दरम्यान, अरुणा इराणी स्वतःला मीडियापासून कायम ठेवतात. परंतु अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांना दोन वेळा स्तनाचा कर्करोग झालेला होता, असा खुलासा  केला. तरीही त्यांनी काम करणं थांबवलं नाही. 

अलिकडेच अरुणा इराणी 'लेहरन रेट्रो' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं, असा खुलासा केला. त्याबद्दल सांगताना त्यांनी म्हटलं की,"एके दिवशी शूटिंगदरम्यान, मला काहीतरी वेगळं जाणवलं आणि मी म्हटलं, "मला बरोबर वाटत नाही आहे. त्यानंतर मी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी छोटी गाठ आहे असं सांगितलं. म्हणून त्यांनी ती गाठ लगेच काढून टाकण्याचा आग्रह धरला." त्यानंतर आपल्याला कर्करोग असल्याचं समजल्यानंतर अरुणा ईराणींना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी केमोथेरपीचा सल्ला दिला. "परंतु, त्याचा माझ्या आपल्या  करिअरवर होईल अशी भीती वाटत होती. शिवाय केमोथेरपीमुळे केस गळतील या भीतीने मी ते टाळलं, असंही त्यांनी सांगितलं. 

दुसऱ्यांदा कर्करोगाचं निदान झालं अन्...

पुढे त्यांनी म्हटलं, "मग डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्हाला एक गोळी घ्यावी लागेल. मी तो पर्याय निवडला. जर मी माझे केस गमावले असते तर मी काम कसं केलं असतं 
ती माझी चूक होती. पहिल्यांदा केमोथेरपी न घेतल्याने मला पुन्हा कॅन्सर झाला. परंतु दुसऱ्यांदा मी ती चूक करणं टाळलं." त्यानंतर अरुणा इराणी यांनी सांगितलं की, २०२० मध्ये, कोविड दरम्यान, त्यांना पुन्हा स्तनाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर अभिनेत्रीने डॉक्टरांचा पूर्ण सल्ला घेतला आणि केमोथेरपी घेतली. एकदा अशीही परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं.त्यानंतर अरुणा या पूर्णपणे बऱ्या झाल्या. 

अरुणा इराणी यांनी १९६१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 'गंगा जमुना' हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत हिंदी, कन्नज, मराठी आणि गुजराती या वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Web Title: bollywood actress aruna irani revealed about she battling breast cancer twice refused chemotherapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.