राजकुमार रावने पत्नीसह घेतलं महाकालचं दर्शन! विधीवत पूजा करतानाचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:14 IST2023-12-15T13:13:19+5:302023-12-15T13:14:09+5:30

राजकुमार राव हा सध्या हिंदी सिनेमासृष्टीतील मोठी मागणी असलेला अभिनेता आहे.

Bollywood actors Rajkummar Rao and Patralekhaa offered prayers at Mahakal Temple in Ujjain | राजकुमार रावने पत्नीसह घेतलं महाकालचं दर्शन! विधीवत पूजा करतानाचा व्हिडीओ आला समोर

राजकुमार रावने पत्नीसह घेतलं महाकालचं दर्शन! विधीवत पूजा करतानाचा व्हिडीओ आला समोर

राजकुमार राव हिंदी सिनेमासृष्टीतील सर्वात गुणी अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमासृष्टीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. राजकुमार राव हा सध्या हिंदी सिनेमासृष्टीतील मोठी मागणी असलेला अभिनेता आहे.  राजकुमार राव हा त्याची पत्नी पत्रलेखासोबत खूप कमी वेळा स्पॉट होतो. पण ते जेव्हापण एकत्र दिसतात, तेव्हा चर्चेचा विषय ठरतात. नुकतेच दोघांनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.

राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा हे बाबा महाकालच्या दरबारात पोहोचले. येथे त्यांनी बाबा महाकालची विधिवत पूजा केली. यानंतर ते नंदी हॉल आणि मंदिर परिसरात प्रार्थना करतानाही दिसले. याचा एक व्हिडीही समोर आला असून श्री महाकालेश्वर मंदिरात दोघेही भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले. 

जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी पंडित यश गुरू यांनी सांगितले की,'राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी बाबा महाकालच्या दरबारात दर्शन व आशीर्वाद घेतला. दर्शन घेतल्यानंतर दोघेही खूप आनंदी होते'. दर्शनानंतर महापालिकाआयुक्त रोशनकुमार सिंह यांनी राजकुमार रावचा बाबा महाकाल यांचा फोटो व प्रसाद देऊन गौरव केला. स्त्री-२ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजकुमार इंदूरला पोहचला होता.   

राजकुमार रावच्या कामाबद्दल सांगायचे तर नुकतेच तो 'गन्स अँड गुलाब' वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  शिवाय, भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राजकुमार रावची  नॅशनल आयकॉन  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकुमार राव लवकरच लोकांना मतदानाचे आवाहन करताना दिसणार आहे.
 

Web Title: Bollywood actors Rajkummar Rao and Patralekhaa offered prayers at Mahakal Temple in Ujjain