"माझी पत्नी आणि तिच्यामध्ये...", ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खान पहिल्यांदाच झाला व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:49 IST2025-06-19T13:46:04+5:302025-06-19T13:49:23+5:30

ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खानने सोडलं मौन, म्हणाला...

bollywood actor zayed khan break silence on affair rumours with esha deol says | "माझी पत्नी आणि तिच्यामध्ये...", ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खान पहिल्यांदाच झाला व्यक्त

"माझी पत्नी आणि तिच्यामध्ये...", ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खान पहिल्यांदाच झाला व्यक्त

Zayed Khan On Affair Rumours With  Esha Deol: अभिनेता जायेद खान (Zayed Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. जायेदने २००३ मध्ये 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.दरम्यान, जायेद खान त्याच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिला आहेत. त्याचं नाव अभिनेत्री ईशा देओलसोबत (Isha Deol) जोडलं गेलं होतं. ईशा आणि जायेद खानने चुरा लिया है तुमने, दस आणि कॅश अशा चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यावेळी त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. यावर आता अभिनेत्याने मौन सोडलं आहे.

अलिकडेच सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. त्यादरम्यान, जायेदने ईशा देओलसोबतच्या अफेअर्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, "मी ईशा देओलबरोबर कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो.आम्ही एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मी माझी पत्नी मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये होतो. शिवाय ईशा आणि मलायका दोघीही चांगल्या मैत्रीणी आहेत. ईशा खूप गोड मुलगी आहे तिचं लग्नही झालंय. ती यापुढेही माझी चांगली मैत्रीण राहिल." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

जायेद खानने २० नोव्हेंबर २००५ रोजी त्याची बालपणीची मैत्रीण मलायका पारेखशी लग्न केलं. या जोडप्याला दोन गोंडस मुलं देखील आहेत. जायेदने त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत 'मैं हू ना', 'शब्द', 'दस', 'वाद', शादी नंबर १', 'कॅश', 'मिशन इस्तंबूल', अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकला. 

Web Title: bollywood actor zayed khan break silence on affair rumours with esha deol says