'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:03 IST2025-07-12T14:58:28+5:302025-07-12T15:03:28+5:30

'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला-"रोल फायनल झालेला, पण..."

bollywood actor vindu dara singh reveals about why sanjay dutt couldnt do son of sardaar 2 movie know the reason | 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला...

'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमध्ये संजय दत्त का नाही? विंदू दारा सिंहचा मोठा खुलासा, म्हणाला...

Son Of Sardaar 2: अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला सन ऑफ सरदार हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. त्यानंतर आता १३ वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजयसह सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त आणि  जुही चावला, विंधू दारा सिंह असे कलाकार झळकले होते. परंतु, या चित्रपटात संजय दत्त नसल्याने चाहते निराश झाले आहेत. यावर आता विंदू दारा सिंहने भाष्य केलं आहे.

येत्या २३ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता या सीक्वलमध्ये नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अलिकडेच Zoom ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विंधू दारा सिंगने 'सन ऑफ सरदार २' मध्ये संजय दत्त का नाही याबद्दल खुलासा केला आहे. त्यावेळी अभिनेता म्हणाला, " चित्रपटात संजय दत्तचा रोल जवळपास फायनल झाला झाला होता, पण चित्रपटाचं शूटिंग परदेशात होणार असल्यामुळे त्याचा व्हिसा नाकारण्यात आला होता.त्यामुळे संजयला शूटिंगला येणं शक्य नव्हतं. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. यामुळे निर्मात्यांना स्क्रिप्टमध्ये बदल करावे लागले आणि ती भूमिका माझ्या वाट्याला आली."

'सन ऑफ सरदार २' मध्ये अजय देवगण आणि मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अजय-मृणालसह रवी किशन, संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, चंकी पांडे, कुबरा सैत, विंदू दारा सिंग,  शरत सक्सेना, अश्विनी काळसेकर, रोशनी वालिया आणि साहिल मेहता हे कलाकारही दिसणार आहेत.

Web Title: bollywood actor vindu dara singh reveals about why sanjay dutt couldnt do son of sardaar 2 movie know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.