"१६ तास काम अन् बिस्किट खाऊन राहायचो...", बॉलिवूड अभिनेत्याला आठवले 'ते' जुने दिवस, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:06 IST2026-01-27T14:58:32+5:302026-01-27T15:06:28+5:30

१६ तास काम अन् बिस्किट खाऊन दिवस काढले! बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षकाळ, म्हणाला...

bollywood actor vikrant massey talk about financial crisis survived on biscuit and water says | "१६ तास काम अन् बिस्किट खाऊन राहायचो...", बॉलिवूड अभिनेत्याला आठवले 'ते' जुने दिवस, म्हणाला...

"१६ तास काम अन् बिस्किट खाऊन राहायचो...", बॉलिवूड अभिनेत्याला आठवले 'ते' जुने दिवस, म्हणाला...

vikrant messey:   टीव्ही इंडस्ट्रीतून येऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी होणाऱ्या  कलाकारांपैकी एक नाव म्हणजे विक्रांत मेस्सी (vikrant messey). विक्रांतने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत च एक हक्काचं स्थान निर्माण केलंय. परंतु, १२ फेल या चित्रपटाने त्या खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळवून दिली.  या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर  द साबरमती रिपोर्ट, ऑंखों की गुस्ताखिय़ॉं यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला. लवकरच तो एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.मात्र, अभिनेत्याचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. आता विक्रांतने एका मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. 

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. अलिकडेच रिपब्लिक वर्ल्ड सोबत संवाद साधताना विक्रांतने त्या जुन्या आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, मी १६ वर्षांचा होतो जेव्हा मी पहिल्यांदाच कॅमेरा सामोर काम केलं. मला अजूनही ती तारीख आठवते. १९ डिसेंबर २००४ हा तो दिवस होता.

बिस्किट खाऊन काढले दिवस...

त्यानंतर विक्रांतने पुढे म्हटलं, मी फक्त १६ वर्षांचा होतो आणि त्यावेळेस दिवसातून चार ट्रेन्स बदलून प्रवास करायचो. जवळपास १६ तास काम करायचो आणि बिस्किट खाऊन  दिवस काढायचो. कोणात्याही मुलाला लहान वयात असं जगणं आवडणार नाही. पण, मला ते काम करणं गरजेचं होतं. असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीमध्ये केला.

सध्या विक्रांत मेस्सी त्याच्या आगामी ओ रोमियो चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सीसह शाहिद कपूर, तृप्ती डिमरी (Triptii Dimri) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाईन विकमध्ये, म्हणजेच १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Web Title : विक्रांत मैसी को याद आए संघर्ष के दिन: '16 घंटे काम, बिस्किट खाकर गुजारा किया'.

Web Summary : विक्रांत मैसी, अब बॉलीवुड स्टार, ने पारिवारिक परिस्थितियों के कारण 16 साल की उम्र में काम करना शुरू कर दिया था। उन्हें ट्रेन से यात्रा करना, लंबे समय तक काम करना और बिस्किट पर गुजारा करना याद है। उनकी नई फिल्म 'ओ रोमियो' 13 फरवरी, 2026 को रिलीज हो रही है।

Web Title : Vikrant Massey recalls struggling days: 'Worked 16 hours, survived on biscuits'.

Web Summary : Vikrant Massey, now a Bollywood star, started working at 16 due to family circumstances. He recalls travelling by train, working long hours, and surviving on biscuits. His new film 'O Romeo' releases February 13, 2026.