"लोकांनी माझ्याबद्दल...", स्वत:बद्दलच्या 'त्या' अफवांवर अहान शेट्टीने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, बाजू सावरत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:00 IST2025-11-18T10:57:55+5:302025-11-18T11:00:29+5:30
"इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी…", सुनील शेट्टीचा मुलगा अहानचं वक्तव्य, 'तडप'सिनेमाच्या अपयशावर म्हणाला...

"लोकांनी माझ्याबद्दल...", स्वत:बद्दलच्या 'त्या' अफवांवर अहान शेट्टीने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, बाजू सावरत म्हणाला...
Ahan Shetty: बॉलिवूडमध्ये अॅक्शन चित्रपटांचा उल्लेख केला तर आपसूकच डोळ्यासमोर सुनील शेट्टीचं नाव समोर येतं. अभिनेता सुनील शेट्टीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सुनील शेट्टीच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा लेक अहानने देखील अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. सध्या अहान बॉर्डर-२ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.अलिकडेच सुनील शेट्टीने लेक अहानच्या बाबतीत इंडस्ट्रीत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा खुलासा केला होता. तसंच अफवा पसरवणाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता यावर अहान शेट्टीने मौन सोडलं आहे.
अलिकडेच अहान शेट्टीच्या त्याच्या महागड्या डिमांड्समुळे त्याला साहिल नाडियाडवाला यांच्या सनकी चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अशा अफवा समोर आल्या होत्या. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने या अफवाचं खंडण करत ही माहिती चुकीची असल्याचं म्हटलं आहे. तेव्हा तो म्हणाला, " लोकांनी माझ्याबद्दल बरंच काही चुकीचं सांगितलं. आणि त्याच्यामुळे काही प्रोजेक्ट्स नाही झाले. पण, या सगळ्या अफवा आहेत. याबद्दल माझ्यासह घरच्यांना आणि निर्मात्यांनाही सत्य माहित होतं."
या मुलाखतीत अहानने असंही सांगितलं, इंडस्ट्रीत तुम्हाला टिकून राहण्यासाठी मनाने देखील तितकंच मजबूत असणं गरजेचं आहे. भविष्यात कदाचित अजूनही जास्त अफवा पसरवल्या जातील, तर त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. त्यानंतर अहान म्हणाला, येत्या काळात परिस्थिती फार विचित्र असेल. अशा गोष्टींचा परिणाम नकळतपणे आपल्यावर होत असतो. पण, या गोष्टींना आपल्यापासून कसं दूर ठेवता येईल, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच,यालाच तर आयुष्य म्हणतात. मात्र, यातून धडा घेत आपण पुढे गेलो पाहिजे.
डेब्यू चित्रपटाच्या अपयशावर अहान म्हणाला...
अहान शेट्टीने तडप चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. मात्र, करिअरमधील त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.या चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना अहान म्हणाला, "जेव्हा तडप सिनेमा रिलीज झाला. त्यावेळी लॉकडाऊन चालू होतं. काही चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरु होते. तर काही चित्रपट बंद होते. कालांतराने ही मर्यादा २५ टक्के करण्यात आली. त्यामुळे पाच राज्यांमध्ये चित्रपटाला व्यवसायिकदृष्ट्या फटका बसला.त्यानंतर एक वर्ष इंडस्ट्रीसाठी कठीण गेलं.चित्रपट चालत नव्हते. लोक थिएटरमध्ये जात नव्हते.त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास कमी होत गेला. या काळात मी माझ्या खूप जवळच्या माणसांना गमावलं. यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की,तु्मच्या चांगला आणि वाईट काळात कोण सोबत असतं." असा खुलासा अहान शेट्टीने केला.