सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:01 IST2024-11-07T16:59:23+5:302024-11-07T17:01:04+5:30
सुनील शेट्टीच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून आगामी वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान अण्णाला जखम झालीय

सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'धन धना धन', 'भागम भाग', 'हलचल' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये अभिनय करुन बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करणारा अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. सुनीलच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे आगामी वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान सुनीलला मार बसल्याने तो जखमी झालाय. सुनील शेट्टी सध्या त्याची वेबसीरिज 'हंटर'मध्ये काम करतोय. याच वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान सुनील शेट्टीला मार बसलाय.
सुनील शेट्टी जखमी, आता प्रकृती कशी?
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सुनील शेट्टी आगामी 'हंटर' वेबसीरिजचं शूटिंग करत होता. या सीरिजच्या शूटिंगवेळेस टीमने अॅक्शन सीन करताना एक लाकडी पट्टी वापरली होती. सुनील शेट्टीने सीनदरम्यान चुकीची हालचाल केल्याने त्याच्या बरगडीला त्या लाकडी पट्टीचा मार बसल्याने अभिनेता जखमी झाला. त्वरीत शूटिंग थांबवून सुनीलवर सेटवरच उपचार करण्यात आले. तातडीने मार बसलेल्या भागाचा एक्स रे काढण्यात आला अन् त्यानुसार उपचार करण्यात आले.
#SunielShetty says he sustained a minor injury during a shoot. 🙏#Newspic.twitter.com/Ajzy9q65qM
— Filmfare (@filmfare) November 7, 2024
सुनील शेट्टीच्या प्रकृतीविषयी टीमने दिली माहिती
दरम्यान सुनील शेट्टीच्या प्रकृतीविषयी त्याच्या टीमने सोशल मीडियावर माहिती दिलीय की, "गंभीर जखम नाहीये. किरकोळ आहे. मी एकदम ठणठणीत असून पुढील शॉटसाठी रेडी आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सदिच्छांसाठी खूप आभार." अशी पोस्ट करुन सुनीलच्या टीमने अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी अपडेट दिले असून अभिनेत्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. सुनील शेट्टी सध्या 'वेलकम टू जंगल', 'हेरा फेरी ३' आणि 'हंटर' या आगामी प्रोजेक्टस् च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.