शाहरुखसारखं स्टारडम इतर कोणत्या कलाकाराला का मिळवता आलं नाही? सुनील शेट्टी म्हणाला-" तो माणूस म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:32 IST2026-03-04T13:22:49+5:302026-03-04T13:32:52+5:30
"तो कायम स्वत:ला...", अभिनेता सुनील शेट्टीचे शाहरुख खानच्या स्टारडमबाबत वक्तव्य, म्हणाला-"त्याच्या पाठीशी…"

शाहरुखसारखं स्टारडम इतर कोणत्या कलाकाराला का मिळवता आलं नाही? सुनील शेट्टी म्हणाला-" तो माणूस म्हणून..."
Suniel Shetty On Shahrukh Khan:बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याची ओळख आहे. शाहरुख खानचा संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत असतात.मात्र, आता अभिनेता सुनील शेट्टीने शाहरुखच्या या स्टारडमबद्दल दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
अलिकडेच सुनील शेट्टीने राज शमानींच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये सुनील शेट्टीला विचारण्यात आलं की शाहरुख खानसारखं स्टारडम इतर कोणत्याही अभिनेत्याला का मिळवता आलं नाही? यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला, "शाहरुखच्या सिनेमातील संगीत हे कायमच उत्तम असायचं आणि भारतात संगीताला खूप महत्त्व आहे. त्याच्या पाठीशी यशजींसारखे दिग्गज होते."
त्यानंतर मग अभिनेता शाहरुखचं कौतुक करत म्हणाला, "शाहरुख आपल्या कलेप्रती पूर्णपणे समर्पित असून तो स्वत:ला नव्याने घडवत असतो. तो माणूस म्हणूनही तितकाच उत्तम आहे आणि त्याची इतरांकडूनही तिच अपेक्षा असते. जिथे गरज असते तिथे शाहरुख कायम हजर असतो."
इतकंच नाहीतर सुनील शेट्टी पुढे म्हणाला, शाहरुख खान सोशल मीडियामध्ये अडकत नाही. तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यावर विश्वास ठेवत नाही. या पिढीतील मुलांना असे वाटतं की सोशल मीडियावर बातम्या पसरवल्याने त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.पण, असं काही नाही.