बॉलिवूडचा बादशाह झाला ‘डॉक्टर’ शाहरुख खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 17:43 IST2016-12-25T17:43:53+5:302016-12-25T17:43:53+5:30
बालिवूडचा बादशाह शाहरुख खान याला अनेक उपाध्या देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याला एका विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही ...

बॉलिवूडचा बादशाह झाला ‘डॉक्टर’ शाहरुख खान
ब लिवूडचा बादशाह शाहरुख खान याला अनेक उपाध्या देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याला एका विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. सोमवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्याला ही पदवी देत सन्मानित करण्यात येणार आहे.
हैदराबाद येथील मौलान आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारोहात त्याला कला, उद्योग व समाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाहरुख खान याला मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले जाणार आहे. कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्ही हा पुरस्कार शाहरुख खानला देत आहोत असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी २६ डिसेंबर रोजी होणाºया दीक्षांत समारोहात त्याला ही पदवी प्रदाण करतील. यासोबतच उद्योगपती संदीप सराफ यांना ‘जश्न ए रेख्ता’ या उर्दू कवितेच्या कार्यक्रमांच्या आयोजनसाठी व उर्र्दू कवितेला मंच उपलब्ध करून देण्याच्या अद्वितीय कामगिरीसाठी त्यांनी मानद डॉक्टरेट देत सन्मानित करण्यात येणार आहे.
![Shah Rukh Khan to be conferred with honorary doctorate]()
दरम्यान शाहरुखला प्रदान करण्यात येत असलेल्या पदवीला आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इमाम आॅफ मशिद्सचे प्रवक्ते नदिमुद्दीन सिद्दिकी यांनी विरोध केला आहे. त्यांनी विद्यापीठाला चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीला नृत्य आणि संगीताशी संबंधित असल्याने त्याची निवड का करण्यात आली अशी सवालवजा टीका केली आहे. विषेश म्हणजे यापूर्वी आमिर खानला मौलान आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट ही पदवी दिली आहे.
नुकताच शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला ‘डीअर जिंदगी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘रईस’ येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याच वर्षी शाहरुखला बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.