शाहिद कपूर काही ऐकत नाही! 'ओ रोमियो'च्या प्रदर्शनापूर्वीच नव्या प्रोजेक्टची घोषणा,'हा' साऊथ स्टार आहे सोबतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:02 IST2026-02-11T12:47:15+5:302026-02-11T13:02:27+5:30
'ओ रोमियो'च्या प्रदर्शनापूर्वीच नव्या प्रोजेक्टची घोषणा, साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम

शाहिद कपूर काही ऐकत नाही! 'ओ रोमियो'च्या प्रदर्शनापूर्वीच नव्या प्रोजेक्टची घोषणा,'हा' साऊथ स्टार आहे सोबतीला
Shahid Kapoor Farzi Part 2: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता शाहिद कपूरला ओळखला जातो. इंडस्ट्रीत दोन दशकांहून अधिक काळ घालवलेल्या शाहिद कपूरने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘कबीर सिंग’ सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या शाहिदचे त्याच्या अभिनय आणि पडद्यावरच्या उत्तम अभिनयासाठी खूप कौतुक केले जाते.सध्या हा अभिनेता ओ रोमियो या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ओ रोमियोचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांना सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच शाहिदीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
Second batch.... WIP... #Farzipic.twitter.com/9haI9a5AYX
— Raj & DK (@rajndk) February 10, 2026
एकीकडे ओ रोमियो सिनेमाची चर्चा असतानाच शाहिद कपूरच्या गाजलेल्या फर्जी या वेब सीरिजचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.याचं कारण म्हणजे फर्जीचे दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर फर्जीच्या दुसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे. राऊंड २ प्रोसेसे.. .#Farzi अशा आशयाची पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या सीरिजमध्ये शाहिद कपूर आणि विजय सेतुपती एकत्र काम करताना दिसणार आहेत. ही पोस्ट रि-शेअर करत शाहिद कपूरनेही म्हटलंय की, “फेकर्स बॅक अट इट” आणि “सनी डेज बॅक सून”.
फर्जीचा पहिला सीझन १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता ही सीरिज प्रदर्शित होऊन तीन वर्षे उलटून गेली आहेत.'फर्जी' मधील सनी आणि मायकेल यांच्या अॅक्शनने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. बनावट नोटांचे जग, फसवेगिरी आणि अॅक्शने परिपूर्ण असलेली ही सीरिजचा दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याबद्दल ओटीटीप्रेमी उत्सुक आहेत.