सलमान खानने का नाकारली IPL टीम खरेदी करण्याची ऑफर, म्हणाला- "मी आता म्हातारा झालो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:49 IST2025-08-11T09:48:28+5:302025-08-11T09:49:11+5:30
सलमान खानला IPL ची टीम खरेदी करण्याची ऑफर होती. परंतु सलमानने ती का नाकारली, याचा खुलासा त्याने केला

सलमान खानने का नाकारली IPL टीम खरेदी करण्याची ऑफर, म्हणाला- "मी आता म्हातारा झालो..."
IPL चा प्रत्येक हंगाम चांगलाच गाजतो. प्रत्येक हंगामात काही ना काही विशेष गोष्ट घडताना दिसते. IPL मध्ये शाहरुख खान, प्रीती झिंटा यांच्या स्वतःच्या IPL टीम आहेत. अशातच IPL मध्ये सलमान खानला सुद्धा टीम खरेदी करायची होती. सलमान खानने याविषयी विधान केलंय त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान गेल्या काही दिवसात मुंबईत वर्ल्ड पँडल लीगच्या (wpl 3) तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी सलमान खान त्याचा छोटा भाऊ सोहेल खानला सपोर्ट करताना दिसताना दिसला. सलमान खान WPL मध्ये सोहेल खानच्या 'खान टायगर्सला' सपोर्ट करताना दिसला. याच इव्हेंटला सलमान खानला त्याने कधी IPL ची टीम खरेदी करायचा विचार केलाय का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सलमानने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
सलमान खान म्हणाला, "आता IPL टीम खरेदी करण्यासाठी मी म्हातारा झालोय. मला खूप वर्षांआधी एक टीम खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु मी ती ऑफर स्वीकारली नाही. याशिवाय मला त्याचा आज पश्चातापही नाही. आम्ही ISPL सोबतच खूश आहेत. ती आमची स्टाईल आहे. टेनिस बॉल, गली क्रिकेट. IPL सारखी मोठी लीग आमच्यासाठी नाही. हीच लीग आमच्यासाठी खूप चांगली आहे.
अशाप्रकारे सलमान खानने त्याच्या भावना व्यक्त केल्या. सलमान खान सध्या 'बॅटल ऑफ गलवान' या सिनेमाचं शूटिंग करतोय. याशिवाय सलमान लवकरच 'बिग बॉस १९' चं सूत्रसंचालन करणार आहे.