Salman Khan : सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेटप्रूफ SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:36 IST2025-06-27T13:34:45+5:302025-06-27T13:36:12+5:30
Salman Khan : सलमान खानने सुरक्षेच्या कारणास्तव एक नवीन suv कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. जाणून घ्या

Salman Khan : सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेटप्रूफ SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता म्हणजे सलमान खान.सलमान खानने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सलमान खानला गेले काही महिने बिष्णोई गँगची धमकी, घराच्या बाहेर झालेला गोळीबार, अज्ञात व्यक्तीचं घरात घुसणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे सलमानने सध्या त्याच्या सुरक्षेची चांगलीच खबरदारी घेतली आहे. सलमानने सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या ताफ्यात एक आलिशान बुलेटप्रूफ गाडी समाविष्ट केली आहे. जाणून घ्या सविस्तर
सलमानने खरेदी केली नवी गाडी
मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने त्याच्या ताफ्यात एक नवी बुलेटप्रूफ लक्झरी SUV गाडी समाविष्ट केली आहे. या गाडीमध्ये आर्मर्ड बॉडी पॅनल आणि रिइनफोर्स्ड ग्लास यांसारख्या बुलेटप्रूफ गोष्टी समाविष्ट आहेत. सलमानच्या या नवीन गाडीची किंमत तब्बल साडे तीन कोटी इतकी आहे. ही बातमी कळताच चाहत्यांनी सलमानचं अभिनंदन केलं आहे. सलमानच्या ताफ्यात अशाच बुलेटप्रूफ गाड्या असून आता या नव्या गाडीमुळे सलमान आणि त्याची टीम अभिनेत्याच्या सुरक्षेची किती काळजी घेत आहेत, हेच स्पष्ट होतंय.
सलमानचं खरेदी केली दिल्ली क्रिकेटची टीम
देशातील पहिली टेनिस-बॉल क्रिकेट लीग असलेली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) लवकरच पार पडणार आहे. या लीगमधील दिल्ली संघाची टीम सलमानने खरेदी केली आहे. सलमान खानने ISPL मध्ये नवी दिल्लीची टीम खरेदी केल्याने हा संघ आता मजबूत बनला आहे , यात शंका नाही. याशिवाय सलमान खानच्या सहभागाने संपूर्ण लीगमध्ये एक उत्साह आणि नवी ओळख निर्माण होईल. अशाप्रकारे शाहरुख खान, प्रिति झिंटाप्रमाणे सलमान खान सुद्धा आता एका क्रिकेट संघाचा मालक झाला आहे.