सैफ अली खान- राणी मुखर्जीचा 'तो' सुपरहिट सिनेमा २१ वर्षांनी पुन्हा होणार प्रदर्शित; जाणून घ्या तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:34 IST2025-05-08T18:29:33+5:302025-05-08T18:34:23+5:30
बॉलिवूड अभिनेता सैफ अली आणि राणी मुखर्जी स्टारर 'हम तुम' हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

सैफ अली खान- राणी मुखर्जीचा 'तो' सुपरहिट सिनेमा २१ वर्षांनी पुन्हा होणार प्रदर्शित; जाणून घ्या तारीख
Hum Tum Movie : बॉलिवूड अभिनेता सैफ अली आणि राणी मुखर्जी स्टारर 'हम तुम' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. २००४ मध्ये हा रोमकॉम चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. इतकी वर्षे उलटूनही आजही तरुणांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. त्यात आता या चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. जवळपास २१ वर्षानंतर हम तुम हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या जुने लोकप्रिय चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत,तसेच त्यांना प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देत आहेत. जुने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरश थिएटरमध्ये गर्दी करत आहे. अशातच सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा 'हम तुम' चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. कुणाल कोहली दिग्दर्शित हा चित्रपट 'व्हेन हैरी मेट सैली' या चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातं. हा चित्रपट आता १६ मे रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, हम तुम या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जीसह किरण खेर, ऋषी कपूर, परिणीता सेठ, विवेक मदान आणि शिल्पा मेहता यांसारखी तगडे कलाकार होते.
हम तुम हा चित्रपट कुणाल कोहली दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित असून यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनला आहे. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेता सैफ अली खानला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.