प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची सोशल मीडियावरून अचानक एक्झिट, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:39 IST2025-11-23T12:33:48+5:302025-11-23T12:39:57+5:30
बॉलिवूड अभिनेत्याने उचललं महत्त्वाचं पाऊल, सोशल मीडियाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाला...

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची सोशल मीडियावरून अचानक एक्झिट, नेमकं कारण काय?
Ronit Roy: रोनित रॉय हा इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. १९९२ साली 'जान तेरे नाम' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, टेलिव्हिजनच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला. 'कसोटी जिंदगी की', 'क्योंकी सांस भी कभी बहु थी' अशा लोकप्रिय मालिकांमधून तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. रोनित रॉयसोशल मीडियावरही कमालीचा सक्रिय असतो.त्याद्वारे वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या त्याने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. नेमकं त्याने या पोस्टमध्ये काय म्हटलंय जाणून घेऊयात...
दरम्यान,रोनित रॉयने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे.याबाबत खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर अभिनेत्याने एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या कुटुंबियांसाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याची घोषणा केली आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "नमस्कार, मी जे बोलणार आहे ते प्रेमाने, समजूतदारपणे आणि सौम्यतेने सांगेन.तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी तुमच्यावर किती प्रेम करतो.मी तुमच्या पोस्ट स्क्रोल करतो, त्यांना लाईक करतो, त्यावर कमेंट करतो आणि शक्य तितक्या डीएम्सना उत्तर देतो. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी खूप आभारी आहे.त्या मी जपून ठेवल्या असून आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ ठेवतो."
त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "पण, मी आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक नवीन मार्ग तयार करायचा आहे.एक असा मार्ग जो मला एक व्यक्ती म्हणून, नातेसंबंधांमध्ये आणि एक कलाकार म्हणून अधिक चांगले बनवेल.हा असा रस्ता आहे ज्यावर मी कधीही चाललो नाही.आराम आणि जुन्या वाईट सवयी सोडून पुढे जाणे आणि चौकटीबाहेर जगणं, मला माहित आहे की हे भीतीदायक आहे, पण ते आवश्यक आहे. डिजिटल जगापासून पूर्णपणे दूर जाणे माझ्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.मी स्वतःची एक नवीन बाजू शोधू शकेन, जी तुम्हाला सर्वांना अधिक आवडेल अशी मला आशा आहे.तर, काही काळासाठी मी सोशल मीडियापासून दूर राहीन. कृपया मला माफ करा. "अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.
रोनित रॉयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो मॉ या चित्रपटात पाहायला मिळाला.