२१ वर्ष उलटूनही टीव्हीवर दाखवत नाहीत रितेश जेनेलियाचा 'तुझे मेरी कसम' चित्रपट; काय असेल कारण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 17:48 IST2024-01-03T17:47:15+5:302024-01-03T17:48:51+5:30

रितेश आणि जिनिलिया यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज २१ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Bollywood actor ritesh deshmukh and actress genelia dsouza cinema tujhe meri kasam why never shows in television or ott platform  | २१ वर्ष उलटूनही टीव्हीवर दाखवत नाहीत रितेश जेनेलियाचा 'तुझे मेरी कसम' चित्रपट; काय असेल कारण? 

२१ वर्ष उलटूनही टीव्हीवर दाखवत नाहीत रितेश जेनेलियाचा 'तुझे मेरी कसम' चित्रपट; काय असेल कारण? 

Tujhe Meri Kasam Movie: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा हे स्टार कपल नेहमीच चर्चेत असते. 'वेड' हा रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रितेश-जिनिलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली. 

त्यातच अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर केलेली पोस्ट सध्या लक्षवेधी ठरलीय. रितेश आणि जिनिलिया यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. साधारणत ३ जानेवारी २००३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन २१ वर्ष पूर्ण झालीत. अनोख्या प्रेम कहानीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटादरम्यान रितेश आणि जिनिलिया या दोघांमध्ये जवळीक वाढली, पुढे त्याचे रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर हे जोडपं अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आलं.  २१ वर्ष उलटूनही  'तुझे मेरी कसम' हा चित्रपट टीव्ही किंवा ओटीटीवर कधीच दाखवण्यात आलेला नाही. 

रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. प्रेम कहानीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी सिनेमागृहात वारंवार जाऊन पाहता यावा याकरिता रामोजी राव यांनी या चित्रपटाचे राइट्स विकलेच नाहीत. सेन्सॉर बोर्डच्या नियमानूसार ज्या चित्रपटांचे डिजिटल राईट्स विकले जातात तेच चित्रपपट सिनेमागृहात प्रदर्शित केले जातात. 'तुझे मेरी कसम' चित्रपट २००३ मध्ये रिलीज झाला होता त्यानंतर याचे डिजिटल राइट्स कोणालाही विकले गेले नाहीत ज्यामुळे आज देखील हा चित्रपट टीव्हीवर दाखवता येत नाही. याच कारणामुळे रितेश आणि जेनेलियाचा 'तुझे मेरी कसम' चित्रपट अजून पर्यंत टीव्हीवर दाखवता आलेला नाही.

येथे पाहा- 

Web Title: Bollywood actor ritesh deshmukh and actress genelia dsouza cinema tujhe meri kasam why never shows in television or ott platform