"प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही...", मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:26 IST2025-07-07T12:22:39+5:302025-07-07T12:26:35+5:30
"प्रत्येक मुद्द्यावर बोलणं आवश्यक नाही, कारण...; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार राव स्पष्टच बोलला

"प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही...", मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया, म्हणाला...
Rajkummar Rao : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन वादंग सुरु आहे. त्यावर कलाविश्वातून तसेच राजकीय मंडळी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच या प्रकरणी आता लोकप्रिय बॉलिवूडराजकुमार रावने त्यावर भाष्य केलं आहे. राजकुमार रावने (Rajkummar Rao) माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत त्याचं मत मांडलं.
अभिनेता राजकुमार राव सध्या त्याचा आगामी चित्रपट 'मालिक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचनिमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला, याबद्दल एका मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला," कलाकारांना एखाद्या मुद्द्याबद्दल व्यक्त व्हावसं वाटत असेल तर त्यांनी त्या मुद्द्यांवर नक्कीच बोललं पाहिजे. पण, त्याने प्रत्येक मुद्द्यावर बोललंच पाहिजे हे गरजेचं नाही. शिवाय एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर काही पोस्ट केलं नाहीतर त्याचा अर्थ असाही नाही की, त्यांना कोणत्याच गोष्टीची पर्वा नसते."
त्यानंतर अभिनेता म्हणाला, "सोशल मीडियावर नसलेल्या लोकांना दुःख होत नाही का? चांगल्या गोष्टींबद्दल त्यांना आनंद होत नाही का? सोशल मीडिया हे त्यांचे आनंद आणि दुःख व्यक्त करण्याचे एकमेव माध्यम आहे का? मुळात हा समज चुकीचा आहे." असा सवालही त्याने उपस्थित केला.
विमान अपघाताचा किस्सा सांगत राजकुमार झाला भावुक
याचदरम्यान, राजकुमार रावने एका विमान अपघाताचा भावुक किस्सा सांगत म्हणाला, "मी एका विमान अपघाताचा फोटो पाहून खूप रडलो होतो. पण, ते देखी सोशल मीडियावर टाकून व्यक्त होणं आवश्यक आहे का ही प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकल्याने त्याच्याप्रती संवेदनशीलता कमी होते या मताचा मी आहे. "असा खुलासा अभिनेत्याने केला.