'शैतान'मधील 'तो' सीन करताना आर.माधवनची झालेली अशी अवस्था; म्हणाला-"प्रेक्षकांना किळस वाटावी असं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:37 IST2025-06-06T09:35:43+5:302025-06-06T09:37:17+5:30

ब्लँकेटमध्ये स्वत:ला गुंडाळलं अन् 'शैतान'मधील 'तो' सीन करताना आर.माधवन झालेला अस्वस्थ, म्हणाला-"प्रेक्षकांना किळस वाटावी असं..."

bollywood actor r madhavan talk about most uncomfortable scene in that give in shaitaan movie  | 'शैतान'मधील 'तो' सीन करताना आर.माधवनची झालेली अशी अवस्था; म्हणाला-"प्रेक्षकांना किळस वाटावी असं..."

'शैतान'मधील 'तो' सीन करताना आर.माधवनची झालेली अशी अवस्था; म्हणाला-"प्रेक्षकांना किळस वाटावी असं..."

R Madhavan:बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर 'शैतान' हा चित्रपट ८ मार्च २०२४ ला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’चे कथानक आणि स्टारकास्टचा अप्रतिम अभिनय सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. शैतानची कथा ही  काळ्या जादूवर आधारित आहे. परंतु या चित्रपटात अजय देवगणपेक्षा खलनायिकी भूमिका साकारणारा आर.माधवन हा भाव खाऊन गेला. वनराज नावाचं खलनायकाचं पात्र साकारुन त्याने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. दरम्यान, याच चित्रपटातील काही सीन्स करताना आर.माधवन अस्वस्थ झाला होता. याचा खुलासा त्याने स्वत केला आहे.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आर. माधवनने शैतान चित्रपटातील त्या सीनच्या शूटिंगचा किस्सा शेअर केला. त्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "चित्रपटातील एक सीन खूपच अस्वस्थ करणारा होता, ज्यामध्ये अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीला रात्रभर नाचण्यास भाग पाडतो. ते खूप संवेदनशील दृश्य होत. एक क्षण असा येतो जेव्हा मी जानकीला रात्रभर नाचायला सांगतो. त्यादरम्यान, थकल्याने जिथे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि लघवी करते. खरंतर, ओरिजनल सीन्स थोडे वेगळे होते पण इथे मला जाणवलं की खलनायक म्हणूनही, जर मी त्या क्षणी त्याकडे भावनिकदृष्ट्या पाहिलं तर सीन पाहिजे तसा होणार नाही. त्यामुळे तो सीन पाहताना प्रेक्षकांना किळस वाटावी अशी माझी इच्छा होती, त्यामध्ये दया वाटावी अशी दृश्ये असू नयेत."

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, त्या सीनदरम्यान मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो आणि मी स्वतच्या अंगावर चादर ओढून घेतली होती. कारण ते दृश्य पाहता येऊ नये. एक अभिनेता म्हणून मला काम केल्याचं समाधान मिळालं." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

Web Title: bollywood actor r madhavan talk about most uncomfortable scene in that give in shaitaan movie 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.