एकेकाळी बॉलिवूडचा गाजलेला हा 'खलनायक' नायकांवरही पडला होता भारी; जाणून घ्या या अभिनेत्याबद्दल खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 05:56 PM2024-02-12T17:56:26+5:302024-02-12T17:59:49+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय खलनायक म्हणून प्राण यांचे नाव अग्रक्रमाणे घेतले जाते.

Bollywood actor pran birthday know about unknown facts and struggle  | एकेकाळी बॉलिवूडचा गाजलेला हा 'खलनायक' नायकांवरही पडला होता भारी; जाणून घ्या या अभिनेत्याबद्दल खास गोष्टी

एकेकाळी बॉलिवूडचा गाजलेला हा 'खलनायक' नायकांवरही पडला होता भारी; जाणून घ्या या अभिनेत्याबद्दल खास गोष्टी

Pran Birth Anniversary: आजच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात उत्तमरित्या खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांमध्ये प्राण यांचे नाव अग्रक्रमाणे घेतले जाते. त्यांच्या ७ दशकांच्या अभिनय कारकीर्दीत या अभिनेत्याने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना विलन समजू लागले. जवळपास ३६२ चित्रपटांमध्ये याअभिनेत्याने काम केले. त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील योगदनाबद्दल राज्य सरकारकडून प्राण यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पाकिस्तानातील लाहोरमधून अभिनय क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं.  बॉलिवूडमधील त्यांनी खलानायकाच्या केलेल्या भूमिकांमुळे लगातार प्राण यांना चित्रपटाच्या ऑफर्स मिळाल्या. यशाच्य़ा शिखरावर असताना या अभिनेत्याच्या  करिअरला अचानक ब्रेक मिळाला. भारत-पाक  फाळणीने त्यांचे काम बंद झाले. त्यामुळे सदाबहार चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या नायकाला शून्यापासून सुरुवात करावी लागली. 

पंजाबी सिनेमा ते बॉलिवूडपर्यंत या नायकाने आपला दबादबा निर्माण केला. पण त्यांचा सिने-इंडस्ट्रीतला प्रवास फार काही सोपा नव्हता. 

छायाचित्रकार म्हणून केलं काम :

प्राण कृष्ण सिकंदर यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी जुनी दिल्ली येथे झाला. एका  मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्राण यांनी वयाच्या १९  व्या वर्षी करिअर सुरू करण्यासाठी लाहोरला पोहोचले. त्यानंतर अगदीच कमी वयात रामलीलामध्ये त्यांनी सीतेची भूमिका केली. अभिनेता होण्याआधी प्राण फोटोग्राफर म्हणून काम करत होते, यादरम्यान त्यांची एका पंजाबी चित्रपट निर्मात्याशी भेट झाली, त्यादरम्यान त्यांना 'यमला जट्ट (१९४०)' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 

नकारात्मक पात्र अमर केले :

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी प्राण यांनी लाहोरमध्ये जवळपास २२ चित्रपटांमध्ये काम केले होते. फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले आणि ते मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत आल्यानंतर लेखक सआदत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्या मदतीने बॉम्बे टॉकीजच्या 'जिद्दी' चित्रपटात काम मिळाले.

आजही प्राण आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. 'जंजीर' चित्रपटात अमिताभ बच्चनसारख्या काही ए-लिस्टर अभिनेत्यांसोबत त्याने काम केले आहे. या चित्रपटात 'पठाण शेरखान' ही व्यक्तिरेखा साकारून प्राणने लोकांची मने जिंकली. त्यांच्या चित्रपटांमध्ये 'अमर अकबर अँथनी', 'उपकार', 'व्हिक्टोरिया 203', 'सनम बेवफा', 'कुदरत का कानून', 'संन्यासी', 'राम और श्याम', 'डॉन', 'दोस्ताना' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. .

Web Title: Bollywood actor pran birthday know about unknown facts and struggle 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.