निळ्या डोळ्यांचा रोमॅंटिक हिरो! स्टारडममध्ये शाहरुखलाही टाकलं होतं मागे; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 14:23 IST2023-03-15T14:22:21+5:302023-03-15T14:23:51+5:30

निळे डोळे आणि गुड लुक्सने ९० च्या दशकात या अभिनेत्यानं तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

bollywood actor jugal hansraj childhood photo viral on social media | निळ्या डोळ्यांचा रोमॅंटिक हिरो! स्टारडममध्ये शाहरुखलाही टाकलं होतं मागे; ओळखलंत का?

निळ्या डोळ्यांचा रोमॅंटिक हिरो! स्टारडममध्ये शाहरुखलाही टाकलं होतं मागे; ओळखलंत का?

निळे डोळे आणि गुड लुक्सने ९० च्या दशकात या अभिनेत्यानं तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. बालकलाकार म्हणून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तो चॉकलेट हिरो बनला. 'घर से निकलते ही' या गाण्याने तर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यावरुन तुम्हाला कळलंच असेल या फोटोत दिसणारा अभिनेता आहे जुगल हंसराज (Jugal Hansraj). सध्या जुगल कुटुंबासोबत अमेरिकेत राहतो.

अभिनेता जुगल हंसराजने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. यामध्ये तो त्याच्या आईसोबत दिसतोय. खूपच गोड असा हा मायलेकाचा फोटो आहे. हा फोटो पाहून मासूम सिनेमात त्याने साकारलेली बालकलाकाराची भूमिका आठवते.

या फोटोवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 'सर खरंच तुम्ही आहात का?' अशी कमेंट एकाने केली आहे. जुगलने 'मासूम', 'मोहोब्बते', 'पापा कहते है', 'आ गले लग जा', 'प्यार इम्पॉसिबल' यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 

२०१४ मध्ये जुगल जॅस्मिन सोबत लग्नबंधनात अडकला. त्यांना एक मुलगा आहे. जुगलने नुकतेच 'शिव शास्त्री बालबोआ' सिनेमात भूमिका केली. चित्रपटात अनुपम खेर आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. तसेच तो नेटफ्लिक्सवरील 'मिसमॅच्ड' या सिरीजमध्येही छोट्या भूमिकेत दिसला.

Web Title: bollywood actor jugal hansraj childhood photo viral on social media