जॉन अब्राहमचा 'तेहरान' थिएटरमध्ये का रिलीज झाला नाही? अभिनेत्याने कारण सांगून टाकलं! म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:37 IST2025-08-14T17:25:24+5:302025-08-14T17:37:47+5:30
जॉन अब्राहमचा 'तेहरान' थिएटरमध्ये का रिलीज झाला नाही? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण, म्हणाला- "वाईट वाटतंय, पण..."

जॉन अब्राहमचा 'तेहरान' थिएटरमध्ये का रिलीज झाला नाही? अभिनेत्याने कारण सांगून टाकलं! म्हणाला...
John Abraham: अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. मॉडेलिंगपासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करुन त्याने आज इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या हा बॉलिवूडचा पोस्टर बॉय 'तेहरान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जॉनसह मानुषी छिल्लरची प्रमुख भूमिका आहे. अरुण गोपालन दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित या चित्रपटाची कथा सत्यकथेने प्रेरित आहे. मागील काही वर्षांपासून या चित्रपट रखडला होता अखेर त्याच्या प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला आहे. आज १४ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. मात्र, हा चित्रपट सिनेमागृहात नाहीतर ओटीटीवर रिलीज झाला आहे. यावर आता जॉन अब्राहमने भाष्य केलं आहे.
नुकताच जॉन अब्राहमने 'न्यूज 18' सोबत संवाद साधला. त्यादरमयान चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना त्याने सांगितलं,,"खरं सांगायचं तर, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाही ही निराशाजनक बाब आहे. त्यामुळे वाईट वाटतंय पण कुठेतरी आम्हालाही समजलं की या निर्णयामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही. सिनेमाची कथा इराण-इस्रायल संघर्षावर आधारित आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करणं शक्य नव्हतं. म्हणून तो ओटीटीवर रिलीज करण्यात आला. यासाठी मी झी-५ चे आभार मानतो. "
यापुढे जॉन प्रेक्षकांना आवाहन करत या स्वातंत्र्यदिनी तेहरान पाहण्याचं आवाहनही केलं. दरम्यान, हा चित्रपट इराण आणि इस्रायल सारख्या देशांभोवती फिरतो. चित्रपटात हिंदी तसेच पर्शियन आणि हिब्रू भाषेतील संवाद आहेत, जे कथेला आंतरराष्ट्रीय रंग देतात. याआधी जॉन हा 'द डिप्लोमॅट'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'द डिप्लोमॅट' सिनेमा १४ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमने एसीपी राजीव कुमारच्या भूमिका साकारली आहे.