पत्नीचा हट्ट अन् विमान सुटलं! Plane Crash मधून थोडक्यात वाचलेला बॉलिवूड सुपरस्टारचा जीव, असं काय घडलेलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:18 IST2026-04-07T15:10:40+5:302026-04-07T15:18:33+5:30

Plane Crash मधून थोडक्यात वाचलेला बॉलिवूड सुपरस्टारचा जीव, असं काय घडलेलं? 

bollywood actor jeetendra birthday special when wife save her life from a plane crash know about what exactly happened | पत्नीचा हट्ट अन् विमान सुटलं! Plane Crash मधून थोडक्यात वाचलेला बॉलिवूड सुपरस्टारचा जीव, असं काय घडलेलं? 

पत्नीचा हट्ट अन् विमान सुटलं! Plane Crash मधून थोडक्यात वाचलेला बॉलिवूड सुपरस्टारचा जीव, असं काय घडलेलं? 

Actor Jeetendra: बॉलिवूडमधील पहिला डान्सिंग स्टार किंवा जंपिंग जैक म्हटले जाणारे अभिनेते म्हणजे जितेंद्र. जितेंद्र हे असे अभिनेता आहेत ज्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शून्यातून विश्‍व उभे केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु झाला तो ज्युनिअर आर्टिस्ट एक्स्ट्रा म्हणून आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्टारपदापर्यंत मजल मारली. व्ही.शांताराम यांनी 1964 मधील ‘गीत गाया पत्थरोंने’ या चित्रपटासाठी हिरो म्हणून जितेंद्रला घेतलं आणि अभिनेता म्हणून त्यांचं करियर सुरु झालं. २५० चित्रपटांच्या आपल्या करिअरमध्ये जितेंद्र यांचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला. आज या लोकप्रिय अभिनेत्याचा वाढदिवस आहे.  मात्र, एक वेळ ते जीवन-मरणाच्या दारातून ते परत आले होते. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊया...

अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी एक प्रसंग घडला होता. मात्र, बायकोच्या हट्टामुळे अभिनेत्याचा जीव थोडक्यात वाचला होता.१९७६ साली अहमदाबादजवळ घडलेल्या एका भीषण अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. जितेंद्र यांनी २०२१ मध्ये द कपिल शर्मा शो मध्ये हा भयंकर किस्सा शेअर केला होता. दरम्यान, जितेंद्र यांना फ्लाइटमधून चेन्नईला जायचं होतं. त्याचदिवशी करवा चौथ होतं. एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर जितेंद्र यांना कळलं की त्यांची फ्लाइट लेट आहे. त्यामुळे ते घरी परत आले, जेणेकरुन शोभा या त्यांचं व्रत पूर्ण करू शकतील. त्यानंतर शोभा यांनी त्यांना एअरपोर्टवर परत जाण्यापासून रोखलं होतं. त्यामुळे जितेंद्र यांनी त्यांच्या मेकअप मॅनला बोलावून घरी जाण्यास सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी ते मद्रासला जाणार असल्याचं म्हटलं होतं.

त्याच रात्री जवळपास १० ते ११ वाजता जितेंद्र यांनी पाली हिल येथील त्यांच्या इमारतीतून बाहेर पाहिलं. त्यावेळी त्यांना एअरपोर्यजवळ एक आगीचा गोळा दिसला. त्यानंतर काही वेळाने त्यांचा फोन सतत वाजू लागला. त्यांना समजलं, की ज्या फ्लाइटने ते जाणार होते, ते क्रॅश झालं होतं. त्यादिवशी जितेंद्र यांच्या पत्नीला काहीतरी विचित्र वाटल्यानेच त्यांनी जितेंद्र यांना पुन्हा एअरपोर्टवर जाण्यापासून रोखलं होतं. ते इंडियन एयरलाइन्सचं फ्लाइट १७१ होतं. आगीच्या या घटनेत जवळपास ९६ लोकांचा मृत्यू झाला होता.

Web Title : पत्नी की ज़िद ने बॉलीवुड स्टार जितेंद्र को विमान दुर्घटना से बचाया।

Web Summary : 1976 में पत्नी के करवा चौथ के लिए घर पर रहने की ज़िद के कारण जितेंद्र बाल-बाल विमान दुर्घटना से बच गए। अहमदाबाद के पास विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें 96 लोग मारे गए। उनकी पत्नी की अंतर्दृष्टि ने उनकी जान बचाई।

Web Title : Wife's insistence saves Bollywood star Jeetendra from plane crash.

Web Summary : Jeetendra narrowly escaped a plane crash in 1976 due to his wife's insistence he stay home for Karva Chauth. The flight crashed near Ahmedabad, killing 96. His wife's intuition saved his life.