८ वर्षांचा भरला संसार मोडला! इमरान खान डिव्होर्सबद्दल पहिल्यांदाच बोलला, म्हणाला-"मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न…",

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:24 IST2026-02-04T14:22:00+5:302026-02-04T14:24:59+5:30

"माझं आणि माझ्या जोडीदारामध्ये…", इमरान खानने घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, का तुटलं नातं? 

bollywood actor imran khan break silence on her divorce with avantika malik | ८ वर्षांचा भरला संसार मोडला! इमरान खान डिव्होर्सबद्दल पहिल्यांदाच बोलला, म्हणाला-"मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न…",

८ वर्षांचा भरला संसार मोडला! इमरान खान डिव्होर्सबद्दल पहिल्यांदाच बोलला, म्हणाला-"मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न…",

Imran Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान बराच काळ अभिनय क्षेत्रापासून दूर होता. जवळपास ११ वर्षांच्या ब्रेकनंतर इम्रानने हॅप्पी पटेल चित्रपटातून इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.या दरम्यानच्या कालावधीत इम्रान इंडस्ट्रीतून गायब असला तरीही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आला होता. इम्रान खानने २०११ साली अवंतिका मलिकसोबत लग्न केलं. परंतु, ८ वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकतंच अभिनेत्याने त्याच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. 

घटस्फोटानंतर  इमरान खान मानसिकदृष्ट्याही खचला होता. २०१९ मध्ये त्याने अवंतिका मलिकसोबत घटस्फोट घेतला. अलिकड़ेच 'ईटाईम्स' सोबत इम्रानने आता एक्स पत्नी अवंतिकासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलला. यावेळी इम्रान म्हणाला,"आमचा घटस्फोट होण्यापूर्वी २०१६ च्या दरम्यान माझ्यासोबत काही वेगळंच घडत होतं. आतून मी पूर्णपणे तुटलो होतो.  मी जसा विचार करायचो त्याच्या उलटच सगळं घडत होतं. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने २०१६-१७ मध्ये मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, वडिलांची जबाबदारी पार पाडण्यासोबतच, मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. असं त्याने उघडपणे सांगितलं.  

घटस्फोटाबद्दल अभिनेता काय म्हणाला?

"त्या काळात, मला जाणवलं की माझं आणि माझ्या जोडीदारामध्ये काहीच चांगलं चाललं नव्हतं.आम्ही अगदीच तरुण असताना आमच्या नात्याला सुरुवात झाली होती. नात्यात काय चांगले आणि काय वाईट याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं.जसजशी वेळ पुढे जाऊ लागली तसं आम्हाला समजू लागलं, की आपण एका चक्रात अडकलो आहोत जे आपण तोडू शकत नाही. त्याक्षणी मला जाणवलं की मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सक्षम राहायचं असेल तर  मला या नात्यातून बाहेर पडावं लागेल."

Web Title : इमरान खान ने आठ साल बाद तलाक पर खुलकर बात की।

Web Summary : 11 साल के अंतराल के बाद, इमरान खान ने अवंतिका मलिक से अपने तलाक पर बात की, मानसिक स्वास्थ्य समस्याओं का हवाला दिया और महसूस किया कि वे एक अस्वास्थ्यकर चक्र में फंस गए थे। उन्होंने अपनी भलाई के लिए अलगाव की आवश्यकता पर जोर दिया।

Web Title : Imran Khan opens up about divorce after eight years of marriage.

Web Summary : Imran Khan, after an 11-year break, discussed his divorce from Avantika Malik, citing mental health struggles and realizing they were stuck in an unhealthy cycle. He emphasized the necessity of separation for his well-being.