"गेली दोन वर्ष आमच्यासाठी…", गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर लेक स्पष्टच बोलली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:34 IST2026-03-11T11:30:49+5:302026-03-11T11:34:24+5:30

गोविंदा अन् सुनीता आहुजामध्ये खरंच बिनसलंय? घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान लेक टीनाने केलेलं वक्तव्य चर्चेत

bollywood actor govinda and sunita ahuja daughter tina breaks silence on parents divorce rumours | "गेली दोन वर्ष आमच्यासाठी…", गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर लेक स्पष्टच बोलली 

"गेली दोन वर्ष आमच्यासाठी…", गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर लेक स्पष्टच बोलली 

Govinda And Sunita Ahuja: बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणून सिनेरसिकांमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे गोविंदा.आपल्या हटके अंदाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता मागील काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. 'साजन चले ससुराल', 'हीरो नंबर वन', 'जिस देश में गंगा रहता है', 'हद कर दी आपने', 'एक और एक ग्यारह' और 'जोड़ी नंबर वन' असा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्याने इंडस्ट्रीला दिले. गतवर्षी २०२५ मध्ये गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. आता या सगळ्यावर अभिनेत्याची लेक टीना आहुजाने प्रतिक्रिया दिली आहे. 

गोविंदाची पत्नी आता सुनीता आहुजा युट्यूबवर सक्रिय असते.अलिकडेच सुनीता आहुजाच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये मुलगी टीना देखील पाहायला मिळाली. यावेळी टीनाने महिला दिनी तिच्या आईला आश्चर्यचकित केलं आणि तिला  अंगठी भेट दिली. या व्लॉगमध्ये टीनाने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर देखील भाष्य केलं. गेली दोन वर्षे या दोघांसाठी चांगली नव्हती, अशी कबुली देखील टीनाने यावेळी दिली. या व्हिडीओमध्ये टीना तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया देत म्हणाली,आपण स्त्रिया इतरांसाठी खूप काही करतो, पण स्वतःबद्दल विचार करत नाही. म्हणून, मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या स्त्रिसाठी काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला.असं म्हणत टीनाने तिच्या आईसाठी फुले आणि एक कार्ड घेतलं.

त्यानंतर आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत टीना म्हणाली, "मागची दोन वर्षे चांगली गेली नाहीत. आयुष्यात प्रचंड अशांतता होती.अनेक चढ-उतार आले." लेकीकडून सुंदर भेटवस्तू मिळाल्यावर सुनीता म्हणाली, "सर्व काही मर्यादेत केले पाहिजे.मी माझी सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत, पण आता मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली आहे.आता मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगणार." असं सुनीना आहुजाने सांगितलं.

गोविंदा आणि सुनीताने १९८७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. आता लग्नाच्या ३८ वर्षांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, मागील काही काळापासून गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला होता. सुनिताने तर गोविंदावर अनेक आरोप लावले. त्याचं एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याचाही आरोप केला. तसंच लेकाच्या करिअरसाठी गोविंदाने काहीच योगदान दिलं नाही असं ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती. 

Web Title : गोविंदा, सुनीता आहूजा के तलाक की अफवाहें: बेटी ने पारिवारिक कलह पर बात की।

Web Summary : गोविंदा और सुनीता आहूजा के तलाक की अफवाहों पर बेटी टीना ने प्रतिक्रिया दी। टीना ने हालिया पारिवारिक संघर्ष को स्वीकार किया और व्लॉग में अपनी मां को उपहार दिया, जबकि सुनीता ने अपने कर्तव्यों को पूरा करने के बाद अपनी स्वतंत्रता पर जोर दिया।

Web Title : Govinda, Sunita Ahuja divorce rumors: Daughter speaks out on family troubles.

Web Summary : Govinda and Sunita Ahuja's rumored divorce addressed by their daughter, Tina. She acknowledged recent family strife and gifted her mother in a vlog, while Sunita asserts her independence after fulfilling duties.