अनन्या पांडेच्या भावाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण! बहुचर्चित 'सैयारा'चा टीझर रिलीज, उलगडणार विलक्षण प्रेमकहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:48 IST2025-05-30T12:47:11+5:302025-05-30T12:48:50+5:30

कलाकारांबरोबर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात.

bollywood actor chunky pandey nephew ahaan pandey starrer saiyaaraa movie teaser released  | अनन्या पांडेच्या भावाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण! बहुचर्चित 'सैयारा'चा टीझर रिलीज, उलगडणार विलक्षण प्रेमकहाणी 

अनन्या पांडेच्या भावाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण! बहुचर्चित 'सैयारा'चा टीझर रिलीज, उलगडणार विलक्षण प्रेमकहाणी 

Saiyaara Teaser: कलाकारांबरोबर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. या कलाकारांप्रमाणेच त्यांची मुलं देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार का असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात. त्यात आता बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक स्टार्स कीड्स चित्रपटातून पदार्पण करत आहेत. इब्राहिम अली खान, राशा थडानी यांच्यानंतर आता आणखी एका स्टार किड्सने इंडस्ट्रीत डेब्यू केला आहे. बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेचा (Chunky Pandey) पुतण्या अहान पांडेने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. 


अनन्या पांडेप्रमाणेच तिचा चुलत भाऊ अहान सुद्धा  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. नुकताच त्याच्या आगामी चित्रपट 'सैयारा' चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर अहानच्या या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. अहान पांडेसोबत या चित्रपटात अनित पड्डा मुख्य भूमिकेत आहे. 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' मालिकेत तिने काम केलं आहे. या चित्रपटाची कथा प्रेमकथेवर आधारित आहे. अक्षय विधानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.तर मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सुरी पहिल्यांदाच एका नव्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत, आणि हा चित्रपट १८ जुलै रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. मोहित सुरी यांनी यापूर्वी "आशिकी-२", "मलंग" आणि "एक विलन" सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या नव्या चित्रपटातून अहान पांडे प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अहान पांडे हा चंकी पांडेचा धाकटा भाऊ चिक्की पांडे म्हणजेच शरद पांडेचा मुलगा आहे. चिक्कीची गणना मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींमध्येही केली जाते. आहान बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीत येण्याची तयारी करत होता. यासाठी तो दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्याकडून प्रशिक्षण घेत होता. अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्याने यश राज यांच्या 'द रेल्वे मॅन' या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता अहानचं पदार्पण विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: bollywood actor chunky pandey nephew ahaan pandey starrer saiyaaraa movie teaser released 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.