'मुन्नाभाई एमबीबीएस'चा तिसरा भाग येणार? बोमन इराणींचं वक्तव्य चर्चेत, हिंट देत म्हणाले-"योग्य वेळ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:33 IST2026-01-06T15:27:09+5:302026-01-06T15:33:12+5:30
गाजलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चा तिसरा भाग येणार? बोमण इराणींनी दिली हिंट

'मुन्नाभाई एमबीबीएस'चा तिसरा भाग येणार? बोमन इराणींचं वक्तव्य चर्चेत, हिंट देत म्हणाले-"योग्य वेळ..."
Boman Irani On Munna Bhai MBBS: बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे आले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. त्यातीलच एक नाव म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. २००३ मध्ये प्रदर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे.राजकुमार हिराणी दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं. या चित्रपटात संजय दत्त, आर्शद वारसी,बोमण ईराणी आणि ग्रेसी सिंग या कलाकारांच्या भूमिका होत्या. चित्रपटातील संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या 'मुन्नाभाई' आणि 'सर्किट' या व्यक्तीरेखा तुफान लोकप्रिय ठरल्या. तर बोमण ईराणींची चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नुकतीच बोमन इराणी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल केलेल्या वक्तव्याने सिनेरसिकांचं लक्ष वेधलं आहे.
सध्या बोमन इराणी हे 'द राजा साब' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलिकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांना ‘मुन्नाभाई 3’बद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "माझा यावर पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा योग्य वेळ येईल आणि कथा योग्य असेल,
तेव्हा मुन्नाभाई ३ नक्कीच बनवला जाईल. शिवाय मला आशा आहे की ते एके दिवशी नक्कीच घडेल.” त्यानंतर ते गमतीत म्हणाले," खरंतर, तुम्ही लोकांनी राजकुमार हिरानींना याबद्दल विचारलं पाहिजे."
त्यानंतर या मुलाखतीमध्ये बोमन इराणींनी संजय दत्तसोबत काम करण्याच्या अनुभवावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "त्याच्यासोबत काम करणं नेहमीच खास राहिलं आहे. मुन्नाभाई हा फक्त एक चित्रपट नाही, तर एक भावना आहे. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत, आणि ते क्षण माझ्यासोबत कायम राहतील." या चित्रपटामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली आहे, असंही बोमण इराणी यांनी सांगितलं.
२००६ मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ या नावाने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा सीक्वल आला. यातही संजय दत्त लीड रोलमध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांनी बक्कळ कमाई केली.