बॉलिवूडच्या हॅण्डसम हंकची 'किंग' चित्रपटात वर्णी! शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार 'हा' अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:02 IST2025-11-27T14:55:28+5:302025-11-27T15:02:06+5:30
शाहरुखच्या 'किंग' चित्रपटात 'या' हॅण्डसम हंकची एन्ट्री, समोर आली मोठी अपडेट

बॉलिवूडच्या हॅण्डसम हंकची 'किंग' चित्रपटात वर्णी! शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार 'हा' अभिनेता
Shahrukh Khan king Movie:बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच शाहरुख खान 'किंग' हा गँगस्टर ॲक्शन थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. नुकतीच या चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
शाहरुख यामध्ये ‘अंडरवर्ल्डचा किंग’ अशी भूमिका साकारत आहे.सिद्धार्थ आनंदने किंग या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.शाहरुख-सुहानासह अभिनेत्री दीपिका पादुकोण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.हा चित्रपट २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान,या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता अभिनेता अक्षय ओबेरॉय या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत.
अक्षय ओबेरॉयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'फायटर','गुडगाव' यांसारख्या बिग बजेट चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.अलिकडच्या काळात तो सनी संस्कार की तुलसी कुमारी या चित्रपटात दिसला होता. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये किंग आणि सुपरस्टार यशच्या टॉक्सिक या सिनेमांचा समावेश आहे.