दोन भागांच्या यशानंतर अजय देवगणच्या 'रेड' सिनेमाचा तिसरा भागही येणार; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:37 IST2025-11-20T11:29:27+5:302025-11-20T11:37:02+5:30
अजय देवगणच्या 'रेड' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला? समोर आली मोठी अपडेट

दोन भागांच्या यशानंतर अजय देवगणच्या 'रेड' सिनेमाचा तिसरा भागही येणार; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली
Raid Movie Third Part: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या चित्रपटांमुळे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतो. त्याचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असते. दरम्यान, अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला रेड हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर अलिकडेच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
'रेड-२' मध्ये अजय देवगण आणि वाणी कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. याशिवाय या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री देखील झळकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता या गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भागही बनवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अजय देवगणच्या या चित्रपटाचा तिसरा भाग २०२६ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करणार असल्याची अपडेट मिळते आहे. 'रेड'च्या तिसऱ्या भागात अजय देवगण इनकम टॅक्स ऑफिसर अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, अद्याप या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो दे दे प्यार दे -२ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. सध्या प्रेक्षकांमध्ये याच सिनेमाची चर्चा सुरु आहे.