"मी ऑफिसमध्ये एकटा असताना त्याने..."; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला भयावह प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 15:19 IST2024-11-11T15:16:30+5:302024-11-11T15:19:46+5:30

बॉलिवूड अभिनेता आदित्य सीलने त्याच्यासोबतच घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे.

bollywood actor aditya seal shared horrible experience in interview about a guy tries to hit him when he was a minor | "मी ऑफिसमध्ये एकटा असताना त्याने..."; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला भयावह प्रसंग

"मी ऑफिसमध्ये एकटा असताना त्याने..."; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला भयावह प्रसंग

Aditya Seal: 'अमर प्रेम की प्रेम कहाणी', 'स्टुडंट ऑफ द इयर' यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता आदित्य सील (Aditya Seal) प्रसिद्धीझोतात आला. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर आदित्यची तगडी फॅनफॉलोइंगही पाहायला मिळते.परंतु अभिनेत्याचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. असंख्य अडचणींवर मात करत त्याने हा पल्ला गाठला आहे. 

नुकतीच अभिनेत्याने 'फिल्मी मंत्रा मीडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आदित्यने त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. त्या दरम्यान,आदित्य सील म्हणाला, "माझ्यासोबत एक प्रसंग घडला होता. तो काही खास माणूस नाही आणि मी त्याचं नावही घेणार नाही. तेव्हा माझं वय जवळपास १८ वर्ष होतं. त्यावेळी त्याने मला वेगळ्याच पद्धतीने मारलं होतं. त्या व्यक्तीने माझ्यासोबत लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता". 

पुढे अभिनेता म्हणाला, "अशा परिस्थितीत स्वत: चा बचाव कसा करायचा? हे मला चांगलच माहित होतं. त्यानंतर जेव्हा ऑफिसमध्ये एकटा असायचो तेव्हा मी काहीच झालं नाही असं वागायचो.  तेव्हा तो मला म्हणायचा आम्हाला हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क करण्याऱ्यांची गरज आहे. तुझं काहीच होणार नाही." असा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला. 

Web Title: bollywood actor aditya seal shared horrible experience in interview about a guy tries to hit him when he was a minor