"मी एक मुलगा म्हणून…", अभिषेक बच्चनचं 'बिग बीं'बद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला- "त्यांचे चित्रपट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:13 IST2025-12-03T14:00:42+5:302025-12-03T14:13:14+5:30
"मी त्यांचे चित्रपट पुन्हा...", अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुलगा अभिषेक काय म्हणाला?

"मी एक मुलगा म्हणून…", अभिषेक बच्चनचं 'बिग बीं'बद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला- "त्यांचे चित्रपट..."
Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जातात. हिंदी सिनेविश्वात जवळपास ५६ वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्याचं सिनेसृष्टीतील योगदान अनेकांसाठी प्रेरणा देणारं आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा हा वारसा पुढेच चालू ठेवत त्यांचा मुलगा अभिषेकनेही इंडस्ट्रीत आपला जम बसवला आहे. त्याच्या कारकिर्दीत अभिषेक अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, सध्या अभिनेता एका मुलाखतीमधील त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
अलिकडेच अभिषेक बच्चनने मुंबईतील आयएफपी फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. दरम्यान ,वडील अमिताभ यांचे चित्रपट कधीच रिक्रिएट करणार नाही, असं वक्तव्य त्याने केलं. अभिषेकच्या या वक्तव्यामुळे अनेकांचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतलं आहे. यावेळी अभिषेक म्हणाला,"मला माझ्या वडिलांचा कोणताही चित्रपट रिक्रिएट करायचा नाही. याचं कारण म्हणजे मला लहानपणापासून त्यांच्यासारखं बनायचं होतं आणि मी त्यांचा सगळ्यात मोठा चाहता आहे.लहान असताना मला जेव्हा त्यांचे चित्रपट पाहण्याची संधी मिळायची तेव्हा मी ते पाहायचो."
त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला,"माझ्या लहानपणी असा एक काळ होता जेव्हा मी फक्त माझ्या वडिलांचे चित्रपट पाहायचो आणि नंतर माझे मित्र अंगणात जाऊन संपूर्ण चित्रपटाची नक्कल करायचे.त्यातही अमिताभ बच्चन यांची भूमिका कोण साकारणार? यावरून आमच्यामध्ये वाद व्हायचे. माझ्या पिढीतील असा एक माणूस सुद्धा सापडणार नाही जो त्यांना आदर्श मानत नसेल. हे मी त्यांचा मुलगा म्हणून बोलत नाहीये,तर एक चाहता म्हणून बोलत आहे."
जेव्हा मी त्यांचा चित्रपट पाहतो...
"माझे वडील ज्यांना मी कायमच माझा आदर्श मानतो, ते नेहमीच होते आणि नेहमीच राहतीलय जेव्हा जेव्हा मी अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहतो तेव्हा मला कधीच वाटत नाही की 'मी हे कसं करू शकलो असतो'. एक कलाकाराचा अहंकार असतो की एखादी भूमिका मी अगदी चांगल्या पद्धतीने करु शकतो. पण, मला वाटत नाही की ती भूमिका अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा कोणी चांगली साकारू शकेल आणि ते करण्यात काही अर्थ नाही." असं मत अभिनेत्याने मुलाखतीत व्यक्त केलं.