कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 13:32 IST2021-11-13T13:32:26+5:302021-11-13T13:32:43+5:30

सध्या कंगनाचे काही हॉट फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Bold photo of Kangana Ranaut in transparent bralet goes viral | कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो होतायेत व्हायरल

कंगना राणौतचे ट्रान्सपरेंट ब्रालेटमधील बोल्ड फोटो होतायेत व्हायरल

वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत चर्चेत येत असते. सध्या कंगना पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली आहे. याशिवाय सध्या तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत तिने ट्रान्सपरेंट ब्रालेट परिधान केलेली पहायला मिळते आहे. तिचे हे फोटो पाहून काही चाहत्यांनी तिच्या लूकची खिल्ली उडवली तर काही चाहत्यांना तिचा हा हॉट अंदाज खूप भावला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना रानौतने तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाची शूटिंग परदेशात पूर्ण केले. त्यानंतर तिने एक रॅपअप पार्टीचे आयोजन केले होती. या पार्टीत तिने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला होता. सध्या तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केले. 


कंगना राणौतने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये “प्रेमामध्ये जगणे व मरणे यात काहीच फरक नाही, त्या व्यक्तीला पाहून जगते, ज्याच्या काफिरमध्ये प्राण जाईल….'  असे लिहिले आहे. तिच्या हॉट फोटोंसह  तिचे कॅप्शन देखील तुफान चर्चेत आहे. 

कंगना लवकरच झळकणार 'धाकड'मध्ये
दरम्यान, कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ती 'धाकड'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, ती 'तेजस' या सिनेमातही दिसणार आहे. यात ती हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Bold photo of Kangana Ranaut in transparent bralet goes viral