​दशकभरानंतर पुन्हा परततेय ‘ही’ बोल्ड अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 16:06 IST2018-02-18T09:40:27+5:302018-02-18T16:06:03+5:30

‘हवस’ हा चित्रपट आणि ‘कलियों का चमन’ या म्युझिक अल्बममुळे लोकप्रीय झालेली मेघना नायडू आठवतेय? कदाचित नाही. कारण मेघना ...

Bold Actress Returns Again After Decade! | ​दशकभरानंतर पुन्हा परततेय ‘ही’ बोल्ड अभिनेत्री!

​दशकभरानंतर पुन्हा परततेय ‘ही’ बोल्ड अभिनेत्री!

वस’ हा चित्रपट आणि ‘कलियों का चमन’ या म्युझिक अल्बममुळे लोकप्रीय झालेली मेघना नायडू आठवतेय? कदाचित नाही. कारण मेघना दीर्घ काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. किमान दशकभरापासून ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण आता सुमारे दहा वर्षांनंतर मेघना चित्रपटात वापसी करणार आहे. होय, ‘सितारा’ या बांगला चित्रपटात मेघना दिसणार आहे.
गेल्या वर्षभरापासून मेघना आजारपणाशी लढतेय. गतवर्षी तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. यादरम्यान मेघनाच्या शरिरातून एक गाठ बाहेर काढली गेली. मेघनाच्या पाठीत एक गाठ वाढली होती. सुरूवातीला मेघनाने याकडे दुर्लक्ष केले. पण हळूहळू ही गाठ वाढत गेली आणि पुढे त्यात इन्फेक्शन झाले. तीव्र वेदना सुरू झाल्यावर मेघना डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मेघनाला लगेच सर्जरीचा सल्ला दिला. यानंतर गतवर्षी मेघनावर ही शस्त्रक्रिया पार पडली होती. 
मेघनाने बॉलिवूडच्या बहुतांश बी ग्रेड चित्रपटांत काम केले आहे. यात ती अतिशय बोल्ड भूमिकांत दिसली. पण इतके करूनही याचा तिला फार फायदा झाला नाही. बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यात ती अपयशी ठरली. १९९९ मध्ये तेलगु चित्रपट ‘प्रेम साक्षी’ या चित्रपटात तिला संधी मिळाली. यानंतर तिने दोन कन्नड चित्रपटही केलेत. पुढे ‘कलियों का चमन’ या म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसली. ‘हवस’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर ‘क्लासिक डान्स आॅफ लव’ या चित्रपटातही ती दिसली.
‘सितारा’ या चित्रपटात मेघना शरीर विक्रय करणा-या महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. भारत -बांगलादेशा देशातील तस्करी चालायची, त्याकाळातील कथा यात सांगितली आहे.

Web Title: Bold Actress Returns Again After Decade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.