'रागिनी एमएमएस रिटर्न्स २' सीरिजमध्ये झळकणार ही बोल्ड अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 07:15 IST2019-08-31T07:15:00+5:302019-08-31T07:15:00+5:30
ऑल्ट बालाजीच्या रागिणी एमएमएस रिटर्न्स वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'रागिनी एमएमएस रिटर्न्स २' सीरिजमध्ये झळकणार ही बोल्ड अभिनेत्री
मिका सिंगसोबत म्युझिक अल्बम समा द समर लव्हमध्ये झळकलेली अभिनेत्री आरती खेत्रपाल आता ऑल्ट बालाजीच्या रागिणी एमएमएस रिटर्न्स वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यात ती प्रेक्षकांना बोल्ड अंदाजात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
बी टाऊनमध्ये वृंदावनमध्ये वाढलेली अभिनेत्री आरती खेत्रपालची चर्चा होते आहे. ती स्विमिंग व कराटेमध्ये चॅम्पियन आहे. तिच्या या खिलाडू वृत्तीचं अक्षय कुमारनं खूप कौतूक केलं होतं. आरतीनं मिका सिंगसोबत म्युझिक व्हिडिओ 'समाःद समर लव्ह'मधून पदार्पण केलं. तसेच सोनी लिव्हच्या प्यार, इश्क और रेंट या वेबसीरिजमध्ये ती पहायला मिळणार आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार ती ऑल्ट बालाजीच्या रागिनी एमएमएस रिटर्न्स वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती बोल्ड अंदाजात पहायला मिळणार आहे.
आरतीने यापूर्वी ५० टेलिव्हिजनवरील जाहिरातीत काम केलं आहे. तसेच १००हून अधिक लाइव्ह शोदेखील केले आहेत. आरती खेतारपाल महिला फुटबॉल टीमची मालक सुद्धा आहे ज्याचं नाव आहे 'गर्ल्स विथ गोल्स'.
स्वत: एक स्पोर्ट्सपर्सन म्हणून आरती क्रीडा क्षेत्रात महिलांना सक्रियपणे प्रोत्साहित करते ज्यामुळे तिने एक स्वतः ची फुटबॉल टीम घेण्याचे ठरवले.
आरती दोन वेब शोमध्ये दिसणार आहे आणि रागिणी एमएमएस नंतर एक फिचर फिल्म 'गर्ल्स टॉक'मध्ये दिसणार आहे.