Body Shaming : ‘फिगर’वरून टर्रर्र उडविणाऱ्यांना दिले हुमा कुरेशीने उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 14:15 IST2017-03-11T08:42:15+5:302017-03-11T14:15:34+5:30
अभिनेत्री हुमा कुरेशी हिने नुकताच डेनिम जीन्स कंपनीसाठी एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या हुमाची तिच्या फिगरवरून ...

Body Shaming : ‘फिगर’वरून टर्रर्र उडविणाऱ्यांना दिले हुमा कुरेशीने उत्तर
अ िनेत्री हुमा कुरेशी हिने नुकताच डेनिम जीन्स कंपनीसाठी एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या हुमाची तिच्या फिगरवरून चांगलीच टर्रर्र उडविली गेली होती. यावरून काहीशी अस्वस्थ झालेल्या हुमाने आता यास उत्तर दिले असून, ‘नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे’ असे तिने म्हटले आहे. ‘जॉली एलएलबी-२’ आणि पहिला आंतरराष्टÑीय सिनेमा ‘वायसराइज हाउस’च्या जबरदस्त यशामुळे हुमा आनंदी असून, तिच्या फिगरवरून टीका करणाºयांना अखेर तिने उत्तर दिले आहे.
हुमाने म्हटले की, ‘नकारात्मक बोलणाºयांचा मी कधीच विचार करीत नाही. कारण टीका करणे हाच या लोकांचा उद्योग असतो. हे लोक तुमची खिल्ली उडवून तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशा फालतू गोष्टी आणि अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका. कारण यामुळे जर तुम्ही तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.’
![]()
पुढे बोलताना हुमा म्हणाली की, ‘माझ्या फिगरची खिल्ली उडवली गेली. कारण मी हवी तशी फिट नाही. याचा अर्थ मी माझ्या शरीराला कसा आकार द्यायला हवा यासाठी मी स्वतंत्र आहे’ असेही ती म्हणाली. हुमा नुकत्याच रिलिज झालेल्या ‘जॉली एलएलबी-२’मध्ये दमदार भूमिकेत बघावयास मिळाली होती. सिनेमातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही केले गेले.
दरम्यान, बॉडी शेमिंगला हुमा बळी पडलेली पहिलीच अभिनेत्री नसून यापूर्वीदेखील बºयाचशा अभिनेत्रींना याचा सामना करावा लागला आहे. नुकतेच स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांनीही बॉडी शेमिंगविरोधात एक व्हिडिओ शेअर करून महिलांच्या वेशभूषेवरून टीका करणाºयांना फटकारले होते.