'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगला बॉबी देओलचंं चोख प्रत्युत्तर, म्हणाला - 'सर्वांना आवडेल असा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:21 IST2023-12-05T16:18:13+5:302023-12-05T16:21:25+5:30

अभिनेता बॉबी देओलने 'अ‍ॅनिमल' ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे. 

Bobby Deol's reply to Animal movie trolling | 'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगला बॉबी देओलचंं चोख प्रत्युत्तर, म्हणाला - 'सर्वांना आवडेल असा...'

'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगला बॉबी देओलचंं चोख प्रत्युत्तर, म्हणाला - 'सर्वांना आवडेल असा...'

अभिनेता रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅनिमलचे सगळीकडे कौतुक होत आहे. तर काही लोकांनी मात्र चित्रपट आवडलेला नाही. काही जण सिनेमाला हिंसक असे म्हणत ट्रोल करत आहेत. यातच आता बॉबी देओलने 'अ‍ॅनिमल' ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे. 

पीटीआयशी बोलताना बॉबी देओल म्हणाला, 'चित्रपट निर्माते लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कथा लिहतात. हे सर्व आपल्या समाजात आहे.  प्रत्येकाला कोणतीही गोष्ट आवडू शकत नाही. मला वाटते की आम्ही मनोरंजन करणारे आहोत आणि वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करू इच्छितो. मी त्याकडे कसे पाहतो'.

'नैतिकता आणि मूल्यांच्या पलीकडे असलेल्या अबरार हकची व्यक्तिरेखा साकारण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही', असेही बॉबी देओलने सांगितले. तो म्हणाला, 'अबरार ज्या प्रकारचा क्रूर आणि दुष्ट आहे, मला तशीच भूमिका करावी लागेल. प्रत्येकाला आवडेल असा चित्रपट बनवणे अवघड असते'.  

 १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय आणि प्रेम चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.  

Web Title: Bobby Deol's reply to Animal movie trolling