रणबीरच्या 'रामायण'मधून बॉबी देओलचा पत्ता कट? साकारणार होता ही महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:17 IST2025-07-08T09:15:45+5:302025-07-08T09:17:18+5:30
Ramayana Movie : सध्या बी-टाउनमध्ये दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची खूप चर्चा आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल सारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०२६ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

रणबीरच्या 'रामायण'मधून बॉबी देओलचा पत्ता कट? साकारणार होता ही महत्त्वाची भूमिका
सध्या बी-टाउनमध्ये दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitiesh Tiwari) यांच्या 'रामायण' (Ramayana Movie) या चित्रपटाची खूप चर्चा आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi), यश (Yash) आणि सनी देओल (Sunny Deol) सारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०२६ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाची पहिली झलक व्हिडीओ रिलीज झाला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. व्हिडीओनंतर चित्रपटातील कलाकारांबद्दल आणखी एक मोठी चर्चा सुरू झाली की, 'रामायण' चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol) कुंभकर्णाची भूमिका साकारत आहे का? आता यावर एक मोठी अपडेट समोर आली आहे.
'रामायण' या चित्रपटात बॉबी देओल रावण (यश) चा भाऊ कुंभकर्णची भूमिका साकारणार असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पण आता अलीकडेच आलेल्या एका वृत्तात या चर्चेला फेटाळून लावले. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार, एका सूत्राने स्पष्ट केले आहे की "हे वृत्त पूर्णपणे अफवा आहेत. बॉबी देओलचे नाव या प्रोजेक्टसोबत अजिबात जोडलेले नाही. कलाकारांबद्दल लोक विविध अंदाज लावत आहेत, परंतु सत्य हे आहे की या पात्रासाठी अद्याप कोणतीही निश्चित एन्ट्री झालेली नाही."
सिनेमाचं बजेट आणि रिलीज डेट
'रामायण' चित्रपटात आतापर्यंत रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), सनी देओल (हनुमान), रवी दुबे (लक्ष्मण) हे कलाकार फायनल झाले आहेत. हा चित्रपट दोन भागात बनवला जात आहे. पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला आणि दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला भाग ८३५ कोटी रुपयांच्या मेगा बजेटवर तयार केला जात आहे.
स्टार कास्ट फी
नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरला दोन्ही भागांसाठी ७५-७५ कोटी रुपये मिळत आहेत. त्याच वेळी, साई पल्लवीला १२ कोटी रुपये आणि यशला दोन्ही भागांसाठी ५०-५० कोटी रुपये मिळत आहेत.