हेमा मालिनीशी लग्न केल्यामुळे धर्मेंद्र आणि बॉबी देओलच्या नात्यात आलेला दुरावा, अभिनेता म्हणाला- "मी वडिलांबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 19:02 IST2024-05-06T19:02:10+5:302024-05-06T19:02:10+5:30

बॉबी देओलला मान्य नव्हतं वडील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न, नाराज होता अभिनेता

bobby deol was unhappy with dharmendra 2nd marriage hema malini father son relation struggle | हेमा मालिनीशी लग्न केल्यामुळे धर्मेंद्र आणि बॉबी देओलच्या नात्यात आलेला दुरावा, अभिनेता म्हणाला- "मी वडिलांबरोबर..."

हेमा मालिनीशी लग्न केल्यामुळे धर्मेंद्र आणि बॉबी देओलच्या नात्यात आलेला दुरावा, अभिनेता म्हणाला- "मी वडिलांबरोबर..."

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील एव्हरग्रीन कपल आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या लग्नाचा ४४वा वाढदिवस साजरा केला. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी १९८०मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांचं हे दुसरं लग्न होतं. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याबरोबर पहिलं लग्न केलं होतं. त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुलेही होती. पहिली पत्नी आणि दोन मुलं असताना त्यांनी हेमा मालिनीबरोबर दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र यांचं हे लग्न बॉबी देओलला मान्य नव्हतं. 

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नामुळे बॉबी देओल नाराज होता. त्यांनी हेमा मालिनीबरोबर लग्न केल्यामुळे बॉबी देओल आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. खुद्द बॉबी देओलनेच याबाबत खुलासा केला होता. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर लग्न केलं तेव्हा बॉबी देओल ११ वर्षांचा होता. या लग्नानंतर बापलेकाच्या नात्यात दुरावा आल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं होतं. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे बॉबी देओल खुश नव्हता. 

"मी १८ वर्षांचा असताना पहिल्यांदा डिस्कोमध्ये गेलो होतो. त्यानंतर माझ्यातला बंडखोर मुलगा जागा झाला. त्यानंतर अनेक वर्ष मी माझ्या आईवडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. त्यांनी माझ्या चांगल्यासाठी सांगितलेल्या गोष्टींकडेही मी दुर्लक्ष केलं होतं. मी आंधळा झालो होतो आणि त्यांची कोणतीही गोष्ट ऐकायची नाही. असंच मी ठरवलं होतं. या काळात वडील आणि माझ्या नात्यात दुरावा आला होता," असं बॉबी देओलने सांगितलं. 

धर्मेंद्र यांना प्रकाश कौर यांच्यापासून ४ मुले आहेत. सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुले आणि विजेता देओल, अजेता देओल या मुली आहेत. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा देओल आणि अहाना देओल या मुली आहेत. 

Web Title: bobby deol was unhappy with dharmendra 2nd marriage hema malini father son relation struggle