‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याचा दिवाना होता बॉबी देओल; नेहमीच जवळ ठेवायचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 21:15 IST2017-09-29T15:15:13+5:302017-09-29T21:15:50+5:30

अभिनेता बॉबी देओल तब्बल चार वर्षांनंतर ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर परतला. मात्र चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना म्हणावी ...

Bobby Deol was the actress's aesthetic; Photo to always be closer! | ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याचा दिवाना होता बॉबी देओल; नेहमीच जवळ ठेवायचा फोटो!

‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याचा दिवाना होता बॉबी देओल; नेहमीच जवळ ठेवायचा फोटो!

िनेता बॉबी देओल तब्बल चार वर्षांनंतर ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर परतला. मात्र चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना म्हणावी तशी पसंत आली नाही. बॉबी बºयाच दिवसापासून पडद्यापासून दूर असल्याने प्रेक्षक त्याला विसरले तर नाही ना? अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. वास्तविक बॉबीने ९०च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अशात त्याला वापसी करण्यासाठी ऐवढी धडपड करावी लागेल असा कोणी विचारही केला नव्हता. बॉबी आता परतला असून, त्याने अधिकाधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकाराव्यात अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल. असो, आज आम्ही बॉबीशी संबंधित एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. बॉबीला लहानपणी एक अभिनेत्री खूपच आवडायची. बॉबी तिला ऐवढे पसंत करायचा की, तिचा फोटो घेऊन तो फिरायचा. 

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोस्टर बॉइज’च्या प्रमोशनदरम्यान बॉबीने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. बॉबीने म्हटले की, लहानपणी मला प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन खूप आवडायच्या. त्यांचा फोटो सदैव माझ्याजवळ असायचा. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा त्याला जया बच्चन यांचे नावदेखील व्यवस्थित उच्चारता येत नव्हते. 



बॉबीने म्हटले की, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी जया बच्चन यांचा खूप मोठा फॅन होतो. त्यावेळी मला त्यांचे नावदेखील व्यवस्थित उच्चारता येत नव्हते. जेव्हा मी ‘शोले’च्या सेटवर शूटिंग बघण्यासाठी गेलो होतो, तेव्हा माझ्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. पुढे मी त्यांचा किती मोठा फॅन आहे, हे त्यांनाही माहीत झाले होते. मी त्यांना आदराने आंटी असे म्हणतो. कारण त्या अभिषेकच्या आई आहेत. जया एक चांगली महिला असल्याचेही बॉबीने सांगितले. 

Web Title: Bobby Deol was the actress's aesthetic; Photo to always be closer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.