बॉबी देओलचा मुलासोबतचा फोटो पाहून चाहते झाले क्रेजी! केली ‘सोल्जर 2’ची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:38 IST2019-01-29T13:37:18+5:302019-01-29T13:38:09+5:30
वाढदिवस दणक्यात साजरा केल्यानंतर बॉबीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर करत, शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. या नव्या फोटोत बॉबी आपल्या मुलासोबत दिसतोय.

बॉबी देओलचा मुलासोबतचा फोटो पाहून चाहते झाले क्रेजी! केली ‘सोल्जर 2’ची मागणी!
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने गत २७ जानेवारीला आपला ५० वा वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांनी बॉबीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवस दणक्यात साजरा केल्यानंतर बॉबीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर करत, शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. या नव्या फोटोत बॉबी आपल्या मुलासोबत दिसतोय. होय, बॉबीचा मुलगा आर्यमन १७ वर्षांचा झाला आहे. आर्यमनसोबतच्या आपल्या या नव्या फोटोला बॉबीने शानदार कॅप्शन दिले. ‘काही असेच फील होतेय. ४९ वर्षांचा प्रवास शानदार राहिला. ५० वे वर्ष आणखी शानदार असणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार. माझ्या मुलाने माझ्यात मित्र शोधला आहे. माझे अख्खे आयुष्य तुम्हा सर्वांसोबत असेच जाईल, अशी आशा करतो,’असे त्याने लिहिले.
तूर्तास बॉबी व आर्यमनचा फोटो चाहत्यांना कमालीचा भावला आहे. अनेकांचे मानाल तर आर्यमन अगदी बॉबीवर गेलाय. काहींनी तर आर्यमनला पाहून बॉबीला ‘सोल्जर 2’ बनवण्याची गळ घातली आहे. होय, प्लीज, मुलासोबत ‘सोल्जर 2’ बनव, असा सल्ला अनेकांनी बॉबीला दिला.
‘सोल्जर’ हा चित्रपट १९९८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात बॉबी मुख्य भूमिकेत होता. तर त्याच्या अपोझिट प्रीति झिंटा दिसली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता चाहत्यांना ‘सोल्जर 2’चे वेध लागले आहेत आणि यात बॉबीचा मुलगा आर्यमन असावा, अशी त्यांची इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा बॉबी किती मनावर घेतो आणि कधी पूर्ण करतो, ते बघूच. तोपर्यंत आर्यमन व बॉबीचा हा अंदाज कसा वाटला ते सांगायला विसरू नका.