बॉबी देओलचा दारूला कायमचा राम राम, म्हणाला "दारू सोडल्याने माझं आयुष्य बदललं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:54 IST2025-10-28T16:53:12+5:302025-10-28T16:54:59+5:30
बॉबी देओलचा निर्णय, अभिनेत्याने दारू पिणे पूर्णपणे सोडले!

बॉबी देओलचा दारूला कायमचा राम राम, म्हणाला "दारू सोडल्याने माझं आयुष्य बदललं"
बॉबी देओल हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. बॉबी देओलनं आपल्या कारकिर्दीमध्ये यश आणि अपयश या दोन्हींची चव चाखली आहे. काही काळ बॉबी हा बॉलिवूडमधून गायब झाला होता. पण, नंतर तो 'बाबा निराला' म्हणून परतला. 'आश्रम'नंतर त्यानं 'ॲनिमल'मधील 'अबरार' या खलनायकी भूमिकेमधून प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या बॉबीच्या करिअरचा ग्राफ उंचावत चालला आहे. अलिकडेच त्यानं आर्यन खान 'बड्स ऑफ बॉलिवूड'मधून पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकलं. सध्य बॉबी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने दारूच्या व्यसनावर मात केल्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.
बॉबी देओलनं नुकतंच खुलासा केला की, त्यानं दारू पिणे पूर्णपणे बंद केले आहे. 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा बदल असल्याचे त्याने स्पष्ट केले. बॉबी म्हणाला, "दारू सोडल्यामुळे मनःशांती, स्पष्ट विचार आणि सर्वांशी चांगले नातेसंबंध जोडता आले. दारू सोडणे हा खासगी आयुष्यात आणि फिल्मी करिअरमध्ये आलेला एक महत्त्वाचा 'टर्निंग पॉइंट' ठरला आहे".
व्यसन सोडण्याचा निर्णय कसा घेतला, यावर बोलताना बॉबी यांनी सांगितले, "हो, मी सोडले आहे, आणि त्यामुळे मला खरोखर मदत झाली आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते आणि व्यसनाचा परिणाम कोणालाच समजत नाही". बॉबीनं सांगितले की, हा निर्णय त्यानं स्वतःसाठी घेतला. तो म्हणाला, "मी ठरवले की देवाने मला दुसरी संधी दिली आहे आणि मी आता माझे सर्वोत्तम करू इच्छितो. आयुष्यात तुम्हाला अशा संधी मिळत नाहीत. आवाज आतूनच यायला हवा". आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास, बॉबी देओल लवकरच अभिनेत्री आलिया भट्सोबत 'अल्फा' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.