कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 19:04 IST2023-03-21T19:03:19+5:302023-03-21T19:04:02+5:30

Aamir Khan-Karisma Kapoor : 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर आणि करिश्मामध्ये एक मिनिटाचा किसिंग सीन शूट करण्यात आला होता. या सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Bitterly cold and a minute-long kissing scene, Aamir-Karisma took 47 takes; Read this interesting story | कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

कडाक्याची थंडी अन् एक मिनिटाचा किसिंग सीन, आमिर-करिश्माने घेतले होते ४७ टेक; वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'(Raja Hindusthani). या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) होती. या चित्रपटात दोघांनी दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाची स्टोरी लाईन छान होती. याशिवाय या चित्रपटात आणखी एक खास गोष्ट होती, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय चित्रपटसृष्टीत याआधी लोकांनी असे काही पाहिले नव्हते.

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर आणि करिश्मामध्ये एक मिनिटाचा किसिंग सीन शूट करण्यात आला होता. चित्रपटातील एवढ्या लांब किसिंग सीनमुळे दोघेही नर्व्हस झाले होते, त्यामुळे या सीनच्या शूटिंगसाठी ४७ रिटेक आणि चार दिवस लागले. कोणत्याही अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन करणे हे अवघड आणि आव्हानात्मक काम असते. शूटींगच्या वेळी खूप लोक तिथे हजर असतात. अशा परिस्थितीत कॅमेऱ्यांसमोर परफेक्ट शॉट देणं खूप अवघड असते. 

चित्रपटात किसिंग सीन करताना आमिर आणि करिश्मा खूपच घाबरले होते. आजच्या काळात किसिंग सीन सामान्य झाले असेल, परंतु २७ वर्षांपूर्वी ओठांवर एक मिनिट किस करणे सामान्य नव्हते. त्या काळात इंटिमेट सीन्स खूप गांभीर्याने घेतले जात होते, पण स्क्रिप्टची मागणी होती. त्यामुळे दोघांनाही हे करावे लागले. उटीच्या सुंदर टेकड्यांमध्ये मुसळधार पावसाच्या दरम्यान दोघांमधील हा किसिंग सीन शूट करण्यात आला. या दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील कडाक्याच्या थंडीने त्यांची दैना केली. जेव्हा या सीनचे शूटींग सुरू झाले तेव्हा सर्वांनाच माहित होते की हे इतके सहज होणार नाही. एका मिनिटाचा हा किसिंग सीन शूट करण्यासाठी अनेक टेक घेण्यात आले, त्यानंतर ४७ रिटेक आणि ४ दिवसांची मेहनत घेण्यात आली. यानंतर चौथ्या दिवशी करिश्मा आणि आमिर दोघांनीही परफेक्ट शॉट दिला, त्यानंतर सर्वांनी ओके ऐकताच सर्वजण खूश झाले.

Web Title: Bitterly cold and a minute-long kissing scene, Aamir-Karisma took 47 takes; Read this interesting story