Happy Birthday Sonali Bendre : अन् सुरु होण्याआधीच संपली ‘ती’ लव्हस्टोरी...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 13:10 IST2020-01-01T13:08:38+5:302020-01-01T13:10:31+5:30
सोनाली अखेरपर्यंत प्रेम व्यक्त करू शकली नाही आणि ही प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच संपली.

Happy Birthday Sonali Bendre : अन् सुरु होण्याआधीच संपली ‘ती’ लव्हस्टोरी...!!
आज सोनाली बेंद्रेचा वाढदिवस. 90 च्या दशकातील सर्वाधिक सुंदर, प्रतिभावान आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनालीने अनेक हिट सिनेमे दिलेत. 2002 मध्ये सोनालीने दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले. पण त्याआधी सोनाली एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. पण सोनाली अखेरपर्यंत हे प्रेम व्यक्त करू शकली नाही आणि ही प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच संपली. सोनालीची रात्रीची झोप उडवणा-या या अभिनेत्याचे नाव होते, सुनील शेट्टी.
होय, सोनाली व सुनीलने टक्कर, सपूत, कहर, भाई अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. या चित्रपटांच्या सेटवर सोनाली सुनीलवर फिदा झाली होती. मनातल्या मनात सुनीलवर ती प्रेम करू लागली. पण तिने कधीच या प्रेमाची कबुली दिली नाही. याचे कारण म्हणजे, सुनील विवाहित होता.
सोनालीला सुनीलचा संसार उद्धवस्त करायचा नव्हता आणि त्यामुळेच सुनीलबद्दलच्या भावना तिने कधीच ओठांवर येऊ दिल्या नाहीत. अर्थात सोनालीच्या डोळ्यांतील प्रेम सुनील जाणून होता.
एकदा अभिनेता गोविंदा एका मुलाखतीत सोनाली व सुनीलच्या या अव्यक्त प्रेमाबद्दल बोलला होता. सुनील शेट्टी विवाहित नसता तर त्याने सोनालीबद्दल विचार केला असता, असे गोविंदा या मुलाखतीत म्हणाला होता. पण ख-या आयुष्यात असे काहीही घडले नाही. हळूहळू सुनील व सोनाली एकमेकांना टाळू लागले आणि ही अव्यक्त लव्हस्टोरी संपली.
पुढे सोनालीच्या आयुष्यात गोल्डी आता आणि सोनालीने त्याच्याशी लग्न केले. दोघांनाही रणवीर नावाचा एक मुलगा आहे. २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सरचा सामना करावा लागला होता. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कला गेली होती. कॅन्सर झाल्याची माहिती देखील तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.