अक्षय कुमारचं पुन्हा तोंड पाहणार नाही..., सुनील शेट्टीनं अशी शपथच घेतली होती!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 14:47 IST2021-08-11T14:45:47+5:302021-08-11T14:47:00+5:30
सुनील व अक्षयची जोडी त्याकाळी हिट होती. पुढे या जोडीनं एकत्र असे अनेक सिनेमे केलेत. पण मग नेमकं कुठं बिनसलं?

अक्षय कुमारचं पुन्हा तोंड पाहणार नाही..., सुनील शेट्टीनं अशी शपथच घेतली होती!!
बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी (Suniel Shetty) याचा आज वाढदिवस. सुनील शेट्टीबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना ठाऊक आहेत. पण सुनील व अक्षय कुमार (Akshay Kumar ) यांच्या भांडणाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? होय, अगदी आयुष्यात पुन्हा कधी अक्षयचं तोंडही पाहणार नाही, अशी शपथ सुनील शेट्टीनं घेतली होती. यामागचं कारण होतं एक गैरसमज.
सुनील व अक्षयची जोडी त्याकाळी हिट होती. मोहरा, हेराफेरी, फिर हेराफेरी, धडकन, दीवाने हुए पागल, सपूत हे या जोडीचे सिनेमे हिट झाले होते. या जोडीचा सिनेमा आला आणि तो फ्लॉप झाला, असं कधी झालं नाही. या जोडीनं एकत्रच करिअरची सुरूवात केली होती. दोघांचीही अॅक्शन हिरो अशी ओळख निर्माण झाली होती. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या सिनेमात सुनील शेट्टी पोलिस अधिका-याच्या भूमिकेत होता. यात अक्षय मुख्य भूमिकेत होता. सिनेमा ब्लॉकबस्टर झाला आणि पुढे या जोडीनं एकत्र असे अनेक सिनेमे केलेत. पण मग कुठं बिनसलं?
तर गोष्ट आहे 2000 सालची. ‘हेराफेरी’ सिनेमात सुनील व अक्षय पुन्हा एकत्र आले. पण या सिनेमाच्या सेटवरचं अक्षय व सुनील यांचं बिनसलं होतं. कारणही तसंच होतं. अक्षय कुमारनं परस्पर आपले सीन चित्रपटातून काढून टाकले, असा सुनीलचा पक्का (गैर)समज झाला होता. यामुळं सुनील इतका संतापला होता की, अक्षयचं तोंड पुन्हा पाहाणार नाही, अशी शपथचं त्यानं घेतली होती म्हणे.
यानंतर एका मुलाखतीत सुनील अक्षयबद्दल असा काही बोलला होता की, ऐकणाºयांच्या भुवया उंचावल्या होत्या. अक्षय हा एक वाईट व त्रासदायक सहकलाकार असल्याचं सुनील म्हणाला होता. सुनीलची ही नाराजी अक्षयला समजली तेव्हा त्यानं लगेच सुनीलला फोन केला आणि त्याच्या मनातील सर्व गैरसमज दूर केले. मी तुझा एकही सीन कापला नाही, असा विश्वास त्यानं दिला. तेव्हा कुठे सुनीलच्या मनातील अक्षयबद्दलचा राग निवळला. यानंतर दोघांनी वाद विसरून पुन्हा एकत्र कामही केलं.