BirthDay Special : एका जाहिरातीने बदलले राजकुमार रावचे नशीब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:08 IST2017-08-31T06:38:56+5:302017-08-31T12:08:56+5:30
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता राजकुमार राव याचा आज (३१ आॅगस्ट) वाढदिवस. आज वाढदिवसानिमित्त राजकुमारबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ...

BirthDay Special : एका जाहिरातीने बदलले राजकुमार रावचे नशीब!
३१ आॅगस्ट १९८४ रोजी गुडगावच्या अहीरवाल येथे राजकुमार रावचा जन्म झाला. ‘फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’मधून बाहेर पडल्यानंतर राजकुमारने मुंबईत राहून अभिनेता होण्याचा निर्णय घेतला.
लहानपणापासून राजकुमार राव बॉलिवूड स्टार्सची मिमिक्री करायचा. खरे तर आधी राजकुमारला अभिनेता बनायचे नव्हतेच. पण दहावीत असताना त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला आणि पुढे यासाठी प्रचंड संघर्ष केला.
रोज वेगवेगळ्या कास्टिंग डायरेक्टर्सला भेटायचे आणि त्यांना काम मागायचे, असे सुमारे वर्षभर केल्यानंतर अखेर राजकुमारची नजर एका जाहिरातीवर गेली. दिवाकर बॅनर्जी यांना आपल्या चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता, अशी ही जाहिरात होती. याच जाहिरातीने राजकुमारचे नशिब फळफळले. राजकुमारने यासाठी आॅडिशन दिले आणि राजकुमारला ‘लव्ह, सेक्स और धोखा’ हा पहिला चित्रपट मिळाला.
पहिल्या चित्रपटातील राजकुमारच्या कामाचे अमाप कौतुक झाले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून बघितले नाही. कदाचित अनेकांच्या नजरेतून सुटले असेल पण ‘गँग आॅफ वासेपूर’मध्ये राजकुमार कॅमिओ रोलमध्ये दिसला होता.
राजकुमार राव हा अन्तिवा पॉल (स्क्रीन नेम पत्रलेखा) हिच्यासोबत बºयाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. पण एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर राजकुमार रावने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. राजकुमार हा आमिर खानचा प्रचंड मोठा चाहता आहे. आमिरला भेटायला मिळणार म्हणून त्याने ‘तलाश’ या चित्रपटात काम केले होते.