​Birthday Special: कधी काळी असा दिसायचा ‘बाहुबली’ प्रभास! वजन वाढवण्यासाठी रोज खायचा २० अंडी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 10:14 IST2017-10-23T04:44:35+5:302017-10-23T10:14:35+5:30

भारतीय चित्रपटसृष्टीचा ‘बाहुबली’ प्रभास याचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. प्रभास आज ३८ वर्षांचा झाला. २३ आॅक्टोबर १९७९ ला तामिळनाडूच्या ...

Birthday Special: Occasionally 'Bahubali' Prabhas! 20 eggs per day to increase weight! | ​Birthday Special: कधी काळी असा दिसायचा ‘बाहुबली’ प्रभास! वजन वाढवण्यासाठी रोज खायचा २० अंडी!!

​Birthday Special: कधी काळी असा दिसायचा ‘बाहुबली’ प्रभास! वजन वाढवण्यासाठी रोज खायचा २० अंडी!!

रतीय चित्रपटसृष्टीचा ‘बाहुबली’ प्रभास याचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. प्रभास आज ३८ वर्षांचा झाला. २३ आॅक्टोबर १९७९ ला तामिळनाडूच्या मद्रास येथे प्रभासचा जन्म झाला. ‘बाहुबली’मध्ये प्रभासचे रफ अ‍ॅण्ड टफ रूप तुम्ही पाहिले. पण प्रभास आधी असा नव्हता. ‘बाहुबली’साठी प्रभासने खास वजन वाढवले होते. आधी प्रभास बराच सडपातळ होता. पण ‘बाहुबली’साठी त्याने सुमारे ३० किलो वजन वाढवले. त्याच्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या काही फोटोंवर नजर टाकल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल.



‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्यासोबतचा ‘बाहुबली’ हा प्रभासचा पहिला चित्रपट नव्हता. त्यापूर्वी राजमौली यांच्या ‘छत्रपति’मध्ये प्रभास दिसला होता. अर्थात त्या चित्रपटाला ‘बाहुबली’इतके अपार यश मिळाले नव्हते.



प्रभासला एकावेळी एकच चित्रपट करायला आवडतो आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे शूट सुमारे ६०० दिवस चालते. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’चे शूट तर तब्बल पाच वर्षे चालले. या काळात प्रभासने एकही चित्रपट साईन केला नव्हता.



प्रभासचे वडिल यू सूर्यनारायण राजू तेलगू चित्रपटसृष्टीतील मोठे दिग्दर्शक आहेत आणि तेलगू स्टार उन्नापति कृष्णम राजू हे त्याचे काका आहेत.



‘बाहुबली’साठी प्रभासने जीवतोड मेहनत केली. यासाठीचे त्याचे वर्कआऊट खूप कठीण होते. वजन वाढविण्यासाठी त्याला दररोज ४० अंडी खावी लागायची.‘बाहुबली’च्या शूटदरम्यान प्रभासने तब्बल २०० कोटींची आॅफर धुडकावून लावली होती. ‘बाहुबली’च्या कामावर दुसºया कामाचा प्रभाव पडू नये, हा त्यामागचा त्याचा उद्देश होता.



रियल लाईफमध्ये प्रभास कितीही बिझी असला तरी त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे. पुस्तके वाचण्यासाठी तो कसाही वेळ काढतो. त्याची एक मिनी लायब्ररी आहे. या लायब्ररीत शानदार पुस्तकांचे कलेक्शन आहे.



प्रभास स्वभावाने कमालीचा लाजरा आहे. ‘बाहुबली’च्या प्रमोशनदरम्यान सगळ्यांनीच हे अनुभवले. प्रभासच्या घरी एक बगिचा आहे. याठिकाणी प्रभासने पक्ष्यांसाठी खुली घरटी बांधली आहेत. पक्षी आपल्या मर्जीने यात ठिकाणी येतात आणि वाट्टेल तेव्हा उडून जातात.



 प्रभास राजकुमार हिरानी यांचा खूप मोठा चाहता आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3इडियट्स’ त्याने २० वेळा पाहिलाय. मात्र  ‘पीके’ मात्र त्याला फार आवडला नाही.



ALSO READ: सर्वांसाठी खुला झाला ‘बाहुबली’ माहिष्मतीचा सेट! पाहा, फोटो!!

बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सलमान खान त्याचे आवडते हिरो आहेत. हॉलिवूडमध्ये रॉबर्ट डिनीरो त्याचा आवडता अभिनेता आहे.

Web Title: Birthday Special: Occasionally 'Bahubali' Prabhas! 20 eggs per day to increase weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.