सोन्यापासून ते गाड्यांपर्यंत! जया बच्चन यांच्याकडे आहेत कोट्यावधींची मालमत्ता; जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 08:00 IST2023-04-09T08:00:00+5:302023-04-09T08:00:02+5:30

जया बच्चन यांची एकूण संपत्ती किती आणि त्यांच्याकडे किती कोटींचे दागदागिने आहेत हे जाणून घेऊयात.

Birthday special jaya bachchan famous actress and member of parliament know her net worth | सोन्यापासून ते गाड्यांपर्यंत! जया बच्चन यांच्याकडे आहेत कोट्यावधींची मालमत्ता; जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

सोन्यापासून ते गाड्यांपर्यंत! जया बच्चन यांच्याकडे आहेत कोट्यावधींची मालमत्ता; जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

जया बच्चन (जया बच्चन) यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी जबलपूर येथे झाला आणि अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले.  जया बच्चन या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक चांगली पत्नी, आई आणि आजी देखील आहेत. एवढेच नाही तर ते एक यशस्वी राजकारणी देखील आहेत. 'चुपके चुपके', 'मिली', 'शोले', 'कोरा कागज' असे असंख्य चित्रपट त्यांचे गाजले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जया बच्चन यांची एकूण संपत्ती किती आणि त्यांच्याकडे किती कोटींचे दागदागिने आहेत हे आज जाणून घेऊयात.

जया बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज कलाविश्वात कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे बच्चन कुटुंबाविषयी चाहत्यांना कायमच आकर्षण असल्याचं दिसून येतं. बच्चन यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. कलाविश्वाप्रमाणेच जया बच्चन आज राजकारणातही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. २०१८ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता.

जया बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती एक हजार कोटी रुपये इतकी आहे. यात त्यांचे पती आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचाही समावेश आहे. २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती ५०० कोटींची होती. त्यात २०१८ पर्यंत वाढ झाली आणि ही संपत्ती एक हजार कोटी रुपयांपर्यंत गेली. जया आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे जवळपास ६२ कोटी रुपयांचे दागदागिने आहेत.

६२ कोटी रुपयांच्या दागिन्यांमध्ये जवळपास २६ कोटी रुपयांचे दागिने हे केवळ जया बच्चन यांचेच आहेत.जया बच्चन यांनी लक्झरी गाड्यांची आवड असून त्यांच्याकडे टोयोटा क्वालिस, टोयोटा लेक्सस या गाण्यांचा समावेश आहे.

Web Title: Birthday special jaya bachchan famous actress and member of parliament know her net worth